
Kolhapur District Co-op Milk Producers (Gokul) Union: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाच्या अध्यक्षपदी अरुण डोंगळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. शनिवारी आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे, आमदार हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत अरुण डोंगळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
दोन वर्षांपुर्वी विद्यमान अध्यक्ष विश्वास पाटील यांची दुध महासंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. विश्वास पाटील यांची मुदत संपली असून ते १७ मे रोजी राजीनामा देणार आहेत. ही मुदत संपल्याने डोंगळे यांच्यावर गोकुळच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाणार आहे.
दरम्यान, अध्यक्ष बदलासाठी शनिवारी ‘गोकुळ’च्या मुख्य कार्यालयात झालेल्या बैठकीत अरुण डोंगळे यांची एकमताने गोकुळच्या अध्यक्षपदासाठी नियुक्ती करण्यात आली.दोन वर्षांपूर्वी १४ मे २०२१ रोजी विश्वास पाटील यांची गोकुळ'च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर ठरलेल्या करारानुसार आता अरुण डोंगळे यांना अध्यक्षपदाची संधी देण्यात येणार आहे.
राजीनाम्याबाबत बोलताना विश्वास पाटील म्हणाले की, कर्नाटक विधानसभा निवडणुकांमुळे बैठक पुढे ढकलली होती.त्याच काळात अध्यक्षपदाचा दोन वर्षांचा कार्यकाळ संपला.आता वरिष्ठांना भेटून राजीनामा देणार आहे. नेत्यांनी दाखवलेल्या विश्वासाबदद्ल मी समाधानी आहे.
दरम्यान, गोकुळमध्ये अध्यक्षबदल होत असतानाच गोकुळवर चौकशीची टांगती तलावरही आहे. गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी केलेल्या तक्रारीनंतर राज्य सरकारने गोकुळ दुध महासंघाचे लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर गोकुळच्या सत्ताधारी गटाने चौकशी थांबवण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत गोकुळ दूध संघाचे चाचणी लेखापरीक्षण थांबवण्यास उच्च न्यायालयाने स्पष्टपणे नकार दिला आहे.
Edited By- Anuradha Dhawade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.