रुपाली चाकणकरांना मुंबईत फोनवरून धमकी देणारा नगरमध्ये गजाआड

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ( Rupali Chakankar ) यांना मुंबईत दुरध्वनीवरून जीवेमारण्याची धमकी देण्यात आली.
रुपाली चाकणकरांना मुंबईत फोनवरून धमकी देणारा नगरमध्ये गजाआड
Rupali Chakankar News, Ahmednagar newsSarkarnama

अहमदनगर - राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर ( Rupali Chakankar ) यांना मुंबईत दुरध्वनीवरून जीवेमारण्याची धमकी देण्यात आली. या विरोधात पोलिसांनी मोहीम उघडून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन त्याला अहमदनगर जिल्ह्यात अटक केली. ( Arrested in Ahmednagar for threatening Rupali Chakankar on phone in Mumbai )

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला नगर तालुका पोलिसांनी आज सकाळी चिंचोडी पाटील (ता. नगर) येथून ताब्यात घेतले आहे. भाऊसाहेब रामदास शिंदे (रा. भेंडा ता. नेवासे) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. रूपाली चाकणकर मुंबई येथील त्यांच्या कार्यालयात असताना त्यांना धमकीचा फोन आला होता. (Rupali Chakankar News)

Rupali Chakankar News, Ahmednagar news
चंद्रकांतदादा अडचणीत! रुपाली चाकणकर 'अॅक्शन मोड'वर

पुढच्या 24 तासांत रुपाली चाकणकर यांना जीवे मारु, असा हा धमकीचा फोन होता. अहमदनगरमधील व्यक्तीने फोन केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरली. सहायक निरीक्षक राजेंद्र सानप व त्यांच्या पथकाने चिंचोडी पाटील गावातून शिंदे याला ताब्यात घेतले आहे.

Rupali Chakankar News, Ahmednagar news
रुपाली चाकणकर म्हणाल्या, शरद पवारांवरील अशा टीका विरोधकांनाही मान्य नाहीत…

पुणे गुन्हे शाखेचे पथक त्याला ताब्यात घेण्यासाठी निघाले आहे. शिंदे हा पूर्वी मुंबईला परिचारक म्हणून काम करत होता. त्याला तेथून काढून टाकण्यात आलेले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in