आमदार गोरेंना बेड्या घालून तात्काळ अटक करा... महेश तपासे

माण Maan, फलटण Phaltan हा जुना मतदारसंघ माझ्या आजोबांचा Grandparents आहे. आता आम्ही मुंबईत Mumbai राहात असलो तरी जिल्ह्याशी आमची नाळ आहे. मागावर्गीय व्यक्तीसाठी For a backward person आम्ही ही भूमिका घेतली आहे.
आमदार गोरेंना बेड्या घालून तात्काळ अटक करा... महेश तपासे
Mahesh Tapasesarkarnama

सातारा : खोटी कागदपत्रे वापरून मागासवर्गीय समाजातील मयत व्यक्तीची जमिन खरेदी करण्याचा प्रयत्न माणचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी केल्याबद्दल त्यांच्यावर दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी आमदार गोरे यांना बेड्या घालून तात्काळ अटक करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी आज सातारा पोलिस अधीक्षकांकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे.

दरम्यान, यासंदर्भात आम्ही लोकप्रतिनिधी कायद्यातंर्गत विधानसभेचे अध्यक्ष झिरवळ यांना भेटून त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी करणार असल्याचेही श्री. तपासे यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे आज साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेऊन मयत असलेल्या मागासवर्गीय व्यक्तीची जमिन हाडपली असल्याबद्दल भाजपचे माण, खटावचे आमदार जयकुमार गोरे यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी केली. यानंतर त्यांनी शासकिय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला.

Mahesh Tapase
आमदार जयकुमार गोरेंसह पाचजणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

तपासे म्हणाले,'' खटाव माण, मतदारसंघाचे भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांनी मयत व्यक्तीची खोटी कागदपत्रे वापरून जमिन खरेदी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर दहिवडी पोलिसांत गुन्हा दाखल झालेला आहे. याची माहिती गृहमंत्र्यांपर्यंत गेली आहे. यासंदर्भात आम्ही आज सातारा पोलिस अधीक्षकांची भेट घेतली असून आमदार गोरे यांना बेड्या घालून तातडीने अटक करावी, अशी मागणी केली आहे.

Mahesh Tapase
आमदार गोरेंच्या अटकेसाठी राष्ट्रवादी आक्रमक; महेश तपासे घेणार सातारा एसपींची भेट...

छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकरांच्या विचारांच्या महाराष्ट्रात मागासवर्गीय व्यक्तीच्या नावे कोणतेही दस्तवेज तयार केले जातात. त्यामागे एक लोकप्रतिनिधी असणे ही गंभीर बाब आहे. माण, फलटण हा जुना मतदारसंघ माझ्या आजोबांचा आहे. आता आम्ही मुंबईत राहात असलो तरी जिल्ह्याशी आमची नाळ आहे. मागावर्गीय व्यक्तीसाठी आम्ही ही भूमिका घेतली आहे. लोकप्रतिनिधी कायद्यातंर्गत विधानसभेचे अध्यक्ष झिरवळ यांना भेटून त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी करणार आहे.

Mahesh Tapase
राष्ट्रवादी सोडताच काँग्रेसकडून मिळाली कारखान्याच्या उमेदवारीची बक्षिसी!

तसेच याबाबत राज्यपाल, राष्ट्रपतींनाही आम्ही निवेदन देणार आहोत. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमकतेने पुढे जाऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाईची मागणी करणार आहे. दहिवडीत काही दिवसांपूर्वी मागासवर्गीय संघटनांनी मोर्चा काढला होता. एवढी गंभीर घटना होत असेल तर राष्ट्रवादी गप्प बसणार नाही. नुकताच मंत्रीमंडळाच्या बैठकीत मागास महामंडळांना वित्त मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरघोस निधी दिला आहे. एखादा लोकप्रतिनिधी अशा पध्दतीने वागत असेल तर मागासवर्गीय समाजाचा अस्मितेचा प्रश्न येत असेल तर राष्ट्रवादी गप्प बसणार नाही.

Mahesh Tapase
भाजपचा साधा कार्यकर्ता राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यापेक्षा मोठा...जयकुमार गोरे

सातारा एसपींनी आम्हाला आश्वासन दिले असून माणूस कोणत्या पदावर आहे, हे महत्वाचे नाही. मागावर्गीय समाजाच्या व्यक्तीच्या बाबतीत घटना घडणे योग्य नाही. त्यांना आम्ही शोधून काढू न्यायालयापुढे हजर करू. पोलिसांवर दबाव आहे का, आमदारांवर अटकेची कारवाई होत नाही, तसेच तुमची सत्ता असूनही तुम्हाला आमदारावर कारवाईसाठी निवेदने द्यावी लागत आहेत, या प्रश्नावर तपासे म्हणाले, पोलिसांनी या संदर्भात कारवाई केलेली आहे. आमदारांचा सहभाग आहे का, हे तपासात समोर आलेले आहे.

Mahesh Tapase
बाबरी पाडली तेव्हा एकही शिवसैनिक नव्हता, मी उपस्थित होतो: फडणवीस

राष्ट्रवादी पक्ष व खासदार शरद पवार हे मागासवर्गीय समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेत आहेत. आमचे सरकार असल्याने आमची नैतिक जबाबदारी आहे. लोकांना न्याय मिळत नसेल तर पहिले धावून गेले पाहिजे. लोकप्रतिनिधीवर कारवाईसाठी आम्ही विधानसभेचे अध्यक्ष, गृहमंत्री, देशाचे सामाजिक न्यायमंत्री, देशाचे गृहमंत्री, तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांना निवेदन देणार आहे. तुमचा लोकप्रतिनिधी असे वागत असेल तर त्याला पक्षातून बरखास्त करणार का, हा प्रश्न आम्ही फडणवीस आणि पाटील यांना विचारणार आहोत.

Mahesh Tapase
'कालचं भाषण म्हणजे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची मिलीभगत'

आमदार गोरेंवर खोटे गुन्हे दाखल केल्याचे सांगितले जात आहे, या विषयी ते म्हणाले, युक्तीवाद करण्यापेक्षा कोर्टासमोर काय आहे ते आले पाहिजे. गंभीर गुन्हे आहेत. फडणवीस साहेबांना कायद्याचा अभ्यास आहे. त्यातून त्यांच्या आमदाराची सुटका नाही. या जिल्ह्याचा नागरीक म्हणून जुन्या काळात वाडवडीलांचे वास्तव्य असल्याने माझी नैतिक जबाबदारी पार पाडण्यासाठी मी येथे आलेलो आहे. आम्ही हा विषय पवार साहेबांपर्यंत नेणार आहे. लोकप्रतिनिधी आहात कोणत्या कलमात काय आहे, ते त्यांना आणि आम्हालाही माहिती आहे. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून आमदारांनी राजीनामा द्यावा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.