प्रकाश आवाडेंनी गुलाल उधळायला बंगल्यावर बोलवले होते.... पण झाले भलतेच!
Arjun Abitkar-Prakash AwadeSarkarnama

प्रकाश आवाडेंनी गुलाल उधळायला बंगल्यावर बोलवले होते.... पण झाले भलतेच!

नागरी बँक-पतसंस्था गटात विरोधी गटाचे उमेदवार व आमदार प्रकाश आबिटकर यांचे बंधू अर्जुन आबिटकर विजयी

कोल्हापूर : जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीत संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या नागरी बँक-पतसंस्था गटात विरोधी गटाचे उमेदवार व आमदार प्रकाश आबिटकर यांचे बंधू अर्जुन आबिटकर विजयी झाले आहेत. सत्तारूढ गटाचे उमेदवार आमदार प्रकाश आवाडे यांना धक्का देत त्यांनी एकतर्फी विजय आपल्या नावे केला. त्यामुळे प्रकाश आबिटकर यांनीच आवाडे यांचाच ‘करेक्ट कार्यक्रम’ केल्याची चर्चा सध्या कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. तर या गटातील विद्यमान संचालक अनिल पाटील यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.

जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीत अर्जुन आबिटकर यांना 614 तर प्रकाश आवाडे यांना 461 मते मिळाली. अनिल पाटील यांना 106 मते पडली. या गटातील 1221 मतदारांपैकी 1204 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या गटातून सत्तारूढ आघाडीतून उमेदवारी मिळावी यासाठी अर्जुन आबिटकर यांचे प्रयत्न सुरू होते, पण त्यांना डावलून सत्तारूढ गटाने आवाडे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या आबिटकर यांनी प्रा. मंडलिक यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेच्या पॅनेलमधून उमेदवारी मिळवली व एकतर्फी विजय मिळवून मुश्रीफ यांच्यासह सत्तारूढ गटाच्या नेत्यांना एकच धक्का दिला.

Arjun Abitkar-Prakash Awade
मुंबई महापालिकेला जमले नाही; ते बीड पालिकेने करुन दाखविले; चित्रा वाघांकडून सेनेच्या क्षीरसागरांचे कौतुक

या गटातून विजयाची खात्री असल्याने आवाडे यांनी कालच फेसबुक पोस्ट टाकून गुलाल उधळायला बंगल्यावर या असा संदेश व्हायरल केल्याची चर्चा होती. पण त्यांचा या गटात दारूण पराभव झाला. या गटातून आबिटकर हे ‘जायंट किलर’ ठरले, त्यांनी आवाडे यांच्यासह सत्तारूढ गटाच्या नेत्यांनाच एकप्रकार धोबीपछाड दिल्याचे बोलले जाते.

दरम्यान, ''साहेब बँकेत सगळे चोर आहेत, निवडणुकीत एकमेकांवर टीका करतात. नंतर गळ्यात गळे. बँकेवर कायमस्वरूपी प्रशासक नेमा,'' अशा शब्दात मतदारांनी मतपेटीत चिठ्य़ा टाकल्याचे समोर आले आहे. मतमोजणीत या अशा मजकुराच्या चिठ्य़ा सापडल्या आहेत. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये मतपेटीमध्ये मतदारांनी पन्नास रुपयांची ओवाळणी ही दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in