Gram panchayat election 2022: कोण आला रे कोण आला...गुवाहाटीचा चोर आला....कुमठेत भाजप, राष्ट्रवादीत राडा...

Koregaon News: कोरेगाव तालुक्यातील कुमठे ग्रामपंचायतीवर आमदार शशिकांत शिंदे यांच्या गटाची सत्ता असून या वेळेस ही ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी आमदार महेश शिंदे यांच्या गटाने ही पॅनेल टाकले आहे.
Mahesh Shinde, Shashikant Shinde
Mahesh Shinde, Shashikant Shindesarkarnama

सातारा : कुमठे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावात कोपरा सभा घेण्याच्या कारणावरून राष्ट्रवादी व भाजपच्या कार्यकर्त्यांत रात्री राडा झाला. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पन्नास खोके...एकदम ओक्के, कोण आला रे कोण आला...गुवाहाटीचा चोर आला, अशी घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला. कुमठे ग्रामपंचायतीत आमदार शशिकांत शिंदे यांच्या गटाची सत्ता असून या वेळेस ही ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी आमदार महेश शिंदे यांच्या गटाने ही पॅनेल टाकले आहे.

कोरेगाव तालुक्यातील कुमठे ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. या ग्रामपंचायतीवर आमदार शशिकांत शिंदे यांच्या गटाची सत्ता असून या वेळेस ही ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी आमदार महेश शिंदे यांच्या गटाने ही पॅनेल टाकले आहे.

काल (बुधवारी) रात्री या गावात दोन्ही बाजूच्या पॅनेलची कोपरा सभा होणार होती. या कारणावरुन राष्ट्रवादी व भाजपच्या कार्यकर्त्यांत रात्री राडा झाला.कोपरा सभेसाठी आमदार महेश शिंदेही तेथे आले होते. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पन्नास खोके एकदम ओके, कोण आला रे... कोण आला.. गुवाहाटीचा चोर आला... अशी घोषणाबाजी केली.

Mahesh Shinde, Shashikant Shinde
koregaon : कोरेगावातील भ्रष्‍टाचाराची लवकरच पोलखोल... शशिकांत शिंदे

तसेच आमदार शशिकांत शिंदेंच्या जयघोषाच्याही घोषणा दिल्या. त्यामुळे येथे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. पण, पोलिसांनी तातडीने गावात येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या महत्वपूर्ण गावात सत्ता यावी यासाठी आमदार महेश शिंदे यांच्या गटाकडून प्रयत्न सुरु आहेत. यावेळी दोन्ही गटात ग्रामपंचायतीसमोरच राडा झाला.

Mahesh Shinde, Shashikant Shinde
Satara : शशिकांत शिंदे अॅक्शन मोडवर, आमदार महेश शिंदेना जशास तसे उत्तर देणार!

कुमठे ग्रामपंचायतीत एकुण १५ सदस्य आणि सरपंद एक असे १६ उमेदवार असून त्यासाठी दोन्ही बाजूकडून ३२ उमेदवार रिंगणात आहेत. ही ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी व भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. त्यातूनच काल गावात राडा झाला. यावेळी पोलिसांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

Mahesh Shinde, Shashikant Shinde
koregaon : शशिकांत शिंदे चिंतनात व्यस्त; महेश शिंदेंचा राष्ट्रवादीला 'दे धक्का'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com