ते काय गायकरांना धोतर नेसायला येणार आहेत का? : 'अगस्ती'च्या निवडणुकीत भाजपकडून टीका

अगस्ती कारखाना निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) व माजी मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) हे उद्या अकोले येथे येणार आहेत.
BJP-NCP
BJP-NCPSarkarnama

अकोले ( जि. अहमदनगर ) - अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही भाजपचा पॅनल विरुद्ध महाविकास आघाडीचा पॅनल अशी होत आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) व माजी मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) हे उद्या अकोले येथे येणार आहेत. यावरून भाजपने महाविकास आघाडीवर टीका सुरू केली आहे. ( Are they going to bring dhoti to the singers? : Criticism from BJP in 'Agastya' elections )

अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू असून अजित पवार व बाळासाहेब थोरात उद्या (ता. 15 ) समृध्दी विकास पॅनलच्या प्रचारासाठी येत असल्याची माहिती आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दिली आहे. उद्या सकाळी दहा वाजता विठ्ठल लॉन्स येथे सभेचा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

BJP-NCP
शिंदे सरकारकडून मविआचे निर्णय रद्द करण्याच्या धडाक्याने अजित पवार संतापले

या कार्यक्रमासंदर्भात भाजपचे तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे यांनी पत्रकार परिषद घेऊन टीका केली. सीताराम भांगरे म्हणाले, अगस्ती निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने शेतकरी समृध्दी पॅनलने राज्यातील दिग्गज नेते अजितदादा पवार,बाळासाहेब थोरात सभेसाठी येत असून आठ हजार मतांच्या गल्लीतील निवडणुकीसाठी राज्यातील माजी मंत्र्यांची हजेरी म्हणजे पराभवाचे उघड सत्य असल्याची टीका त्यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, अगस्ती कारखान्याच्या निवडणुकीत माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या शेतकरी विकास मंडळाच्या विरोधात सर्व तालुक्यातील विरोधक एकवटले आहेत. तरी शेतकरी विकास मंडळाला ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. सीताराम गायकर व त्यांच्या हितचिंतकांना माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी मोठे केले महत्वाची पदे दिली. मात्र विधानसभेत पराभव होताच या मंडळींनी पाठ फिरवली, असा आरोपही त्यांनी केला.

BJP-NCP
सिताराम गायकरांचे धोतर फेडणार : अजित पवार

अगस्तीमध्ये जे गोंधळ झाले त्यास कोण जबाबदार आहे, हे जनतेला माहीत आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या नोकर भरती घोटाळ्यात किती सगे सोयरे लावले मात्र जिल्हा बँकेत वर्णी लावण्यासाठी पक्ष प्रवेश करून आपल्या पदरात संचालक पद पाडून घेतले. त्यावेळी शेतकरी नेते दशरथ सावंत यांना अजित पवार यांचा दबाव आणून माघार घेण्यास भाग पाडले, असे त्यांनी सांगितले.

BJP-NCP
BJP Vs NCP: अकोल्यात धोतरावरून पेटलं राजकारण

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जाहीर सभेत मंत्री अजित पवार यांनी सीताराम गायकर यांचे धोतर फेडण्याची भाषा केली. तेच अजित पवार आता धोतर नेसविण्यसाठी येणार आहेत का? असा सवाल करून भांगरे यांनी गायकर, आमदार किरण लहामटे, अशोक भांगरे याना पराभव दिसत असून त्यामुळेच अजित पवार, बाळासाहेब थोरात यांना बोलवण्यात आले असल्याची टीका भांगरे यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in