पोटनिवडणुकीत दिलेला शब्द अजित पवारांनी पाळला

शिवसेनेचे नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोलापूर दौऱ्यात निधी देण्याबाबत मागणी केली होती.
Mangalvedha

Mangalvedha

sarkarnama

मंगळवेढा : मंगळवेढा (Mangalvedha) नगरपालिकेच्या टाऊन हॉल साठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. याबाबतचे पत्र नुकतेच नगर पालिकेला प्राप्त झाले. नगराध्यक्षांनी गत निवडणुकीपूर्वी दिलेल्या जाहीरनाम्यातील शेवटच्या कामाला कोट्यवधी रुपयांची तरतूद झाल्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत ही मंजुरी निर्णायक करणार असल्याचे सांगितले जात आहे.

<div class="paragraphs"><p>Mangalvedha</p></div>
अमित शहांचा पुण्यातील मुक्काम कोठे? अजितदादा म्हणाले, ``माझ्या सूटमध्ये चालेल...``

शहरातील सांस्कृतिक कार्यक्रमासाठी असलेल्या टाऊन हॉलची इमारत धोकदायक झाली होती. त्यामुळे नगरपालिकेने नवीन इमारत बांधण्याबाबतचा सात कोटीचा प्रस्ताव राज्य सरकारला तीन वर्षांपूर्वी सादर केला होता. हा प्रस्ताव गेली तीन वर्षे प्रलंबित होता. त्या मुळे शहरातील विविध सांस्कृतिक कार्यक्रमावर मर्यादा येत होत्या. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) त्यांना नगराध्यक्ष अरुणा माळी यांनी प्रलंबित कामाबाबत आठवण केली. त्यावेळी या कामास निधी देण्याबाबतचा शब्द अजित पवार यांनी दिला होता.

शिवाय शिवसेनेचे नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोलापूर दौऱ्यात निधी देण्याबाबत मागणी केली होती. त्यानुसार निधी मंजूरी बाबतचा शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध झाला. या बाबतचे पत्र नगरपालिकेला देखील प्राप्त झाले. या नव्या कामामुळे शहरातील विविध सांस्कृतिक कार्यक्रम व कलाकार, साहित्यिकांना एक चांगल्या प्रकारचे व्यासपीठ यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे. नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर कोट्यवधी रुपयांच्या निधीची मंजुरी मिळाल्यामुळे त्याचा लाभ आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीला होणार आहे.

<div class="paragraphs"><p>Mangalvedha</p></div>
'माझा तर नेमच नव्हता... मी निवडून येईल, असे कोणालाच वाटत नव्हते!'

सदरच्या प्रलंबित कामासाठी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, भगीरथ भालके, राहुल शहा, लतीफ तांबोळी, रामेश्वर मासाळ, पी. बी. पाटील, अरुण किल्लेदार, चंद्रशेखर कौडूभैरी, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, पक्ष नेते अजित जगताप, प्रवीण खवतोडे भागीरथी नागणे, संकेत खटके यांच्याबरोबर नगरपालिकेचे नगरसेवक व प्रशासनानी सहकार्य केले. भविष्यात हे टाऊन हॅाल माफक दरात सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार, असल्याचे नगराध्यक्ष अरुणा माळी यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com