एकनाथ शिंदेंकडून मंगेश चिवटेंना ‘त्या’ कामगिरीची बक्षिसी!

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे विशेष कार्य अधिकारीपदी मंगेश चिवटे यांची नियुक्ती
Mangesh Chivte-Eknath Shinde
Mangesh Chivte-Eknath ShindeSarkarnama

सोलापूर : मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे विशेष कार्य अधिकारी म्हणून सोलापूर (Solapur) जिल्ह्याच्या करमाळा (Karmala) तालुक्यातील मंगेश चिवटे (Mangesh Chivte) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चिवटे यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षात यापूर्वी काम केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे विश्वासू म्हणून चिवटे यांना ओळखले जाते. (Appointment of Mangesh Chivte as Special Duty Officer of Chief Minister's Medical Aid Cell)

येत्या सोमवारी (ता. २५ जुलै) चिवटे या कक्षाचा पदभार स्वीकारणार आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष हा मुंबईत मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर आहे. मंगेश चिवटे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील आहेत. त्यांच्या निवडीमुळे करमाळा तालुक्यातून अभिनंदन होत आहे.

Mangesh Chivte-Eknath Shinde
'उद्धव ठाकरेंनी विधानसभेत जुन्या जखमांवरील खपल्या काढण्याची गरज नव्हती'

दरम्यान, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सहायता कक्ष कार्यरत होता. मात्र, अनेक अटींमुळे गरजूंना लाभ मिळू शकला नव्हता. या कक्षाची स्थापना देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर १३ मार्च २०१५ पासून झाली होती. सीएसआर निधीतून या कक्षाच्या माध्यमातून मदत केली जाते. दारिद्रयरेषेखालील रुग्णांना या कक्षातून खर्चाच्या ६० टक्केपर्यंत मदत केली जाते.

Mangesh Chivte-Eknath Shinde
अभिजित पाटलांचा भालकेंना दणका; बारा कोटींच्या वसुलीसाठी ४०० जणांना नोटिसा

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सहायता कक्षाची कल्पना आपण त्यांना सुचवली होती. तसेच, ओमप्रकाश शेटे यांचे नावही या कक्षासाठी त्यांना सुचविले होते. त्यानंतरच्या काळात ही योजना बंद पडली. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर पुन्हा विश्वास टाकला आहे, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असे मंगेश चिवटे यांनी निवडीनंतर सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com