उदयसिंह पाटलांचा उमेदवारी अर्ज; अन्‌.. सहकारमंत्र्यांच्या उंडाळेत गाठीभेटी!

कराड सोसायटी गटातुन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यासाठी त्यांनी सहा महिन्यांपासुन फिल्डींगली लावली आहे.
Balasaheb Patil in Visit
Balasaheb Patil in VisitHemant Pawar

कऱ्हाड : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकार व पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी ज्येष्ठ नेते जयसिंगराव पाटील यांची त्यांच्या उंडाळे येथील निवासस्थानी भेट घेतली. कालच माजी मंत्री (कै) विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र उदयसिंह पाटील यांनी जिल्हा बॅंकेसाठी कराड सोसायटी गटातुन उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पाटील यांनी उंडाळेत दिलेली भेट चर्चेची ठरली आहे.

सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्याचीही कार्यवाही सध्या सुरु झाली आहे. कराड सोसायटी गटातुन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. यावेळी त्यांनी कराड सोसायटी गटावरच भर दिला आहे. त्यासाठी त्यांनी सहा महिन्यांपासुन फिल्डींगली लावली आहे. दरम्यान जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी अॅड. उदयसिंह पाटील यांनी कराड सोसायटी गटातुन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Balasaheb Patil in Visit
वाढदिनीच शशीकांत शिंदेंना महेश शिंदेंनी दिला धक्का; जिहे-कटापूरचे केले जलपूजन

उंडाळकर गटाने ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण, (कै) आबासाहेब वीर यांचे मार्गदर्शनाखाली १९६७ साली कऱ्हाड सोसायटी मतदारसंघातून विलासराव उंडाळकर यांनी जिल्हा बँकेत प्रवेश केला. सलग ११ वेळा याच मतदारसंघातून काका बँकेत संचालक राहिले. त्यांच्या जागेवर त्यांचे पुत्र उदयसिंह पाटील यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह त्यांच्या संघटनेने धरल्यामुळे काल अर्ज दाखल केल्याचे जाहीर केल आहे.

Balasaheb Patil in Visit
उदयनराजे गृहनिर्माणमधून लढणार; सभासदांवर अन्याय करणाऱ्यांचा बंदोबस्त करणार

दरम्यान त्यांचा अर्ज दाखल झाल्यानंतर लगेचच दुसऱ्याच दिवशी पालकमंत्री पाटील यांनी थेट कऱ्हाड दक्षिण मतदार संघातील उंडाळेत जावुन थेट (कै) विलासकाका उंडाळकर यांचे बंधु ज्येष्ठ नेते जयसिंगराव पाटील यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत ॲड. आनंदराव उर्फ राजाभाऊ पाटील व सहकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा बॅंकेच्या कऱ्हाड सोसायटी मतदारसंघाच्या अनुषंगाने चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पालकमंत्र्यांची कऱ्हाड दक्षिणेतील ही भेट चर्चेची ठरली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in