लॉकडाऊनविरोधात अनुराधा नागवडे झाल्या आक्रमक : महसूलमंत्र्यांना घातले साकडे

श्रीगोंदे ( Shrigonde ) तालुक्यातील काष्टी, कोळगाव, बेलवंडी यासह नऊ गावात कोरोना ( Corona ) वाढल्याचे कारण देत प्रशासनाने लॉकडाऊन ( Lockdown ) केला आहे.
लॉकडाऊनविरोधात अनुराधा नागवडे झाल्या आक्रमक : महसूलमंत्र्यांना घातले साकडे
Anuradha Nagwade called on Revenue Minister Balasaheb ThoratSanjay A. Kate

श्रीगोंदे (अहमदनगर) : श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी, कोळगाव, बेलवंडी यासह नऊ गावात कोरोना वाढल्याचे कारण देत प्रशासनाने लॉकडाऊन केला आहे. या बाबत काष्टीतील व्यापाऱ्यांनी काल ( गुरुवारी ) तहसील कार्यालयासमोर उपोषणही केले होते. Anuradha Nagwade becomes aggressive against lockdown: Question raised before Revenue Minister

या उपोषण आंदोलना तळ ठोकून असणाऱ्या काँग्रेसच्या महिला प्रदेश सरचिटणीस अनुराधा नागवडे यांनी आज हाच प्रश्न हाती घेत कार्यकर्ते व व्यापाऱ्यांसोबत थेट मुंबई गाठली. काष्टीसोबत कोळगाव, बेलवंडी गावचे कार्यकर्तेही त्यांच्या बरोबर होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना साकडे घालत सण सुरु झालेत व्यापाऱ्यांना वेठीस धरु नये, लॉकडाऊन उठवा अशी विनवणी त्यांनी केली.

Anuradha Nagwade called on Revenue Minister Balasaheb Thorat
अनुराधा नागवडे म्हणाल्या, भाजप घाणेरडे राजकारण करतेय

काष्टी हे आमदार बबनराव पाचपुते यांचे गाव आहे. पाचपुते यांचे काष्टीवर गेली अनेक दशके अधिराज्य आहे. यावेळी मात्र काष्टीची व्यथा आता अनुराधा नागवडे यांनी हाती घेतली असल्याचे दिसते. कालही तहसील कार्यालयापुढे त्या व्यापाऱ्यांच्या उपोषणात तळ ठोकुन होत्या. प्रशासनाची त्यांची चर्चा सुरु होती. तेथे मार्ग निघाला नसल्याने आज कुठेही चर्चा न करता ठराविक लोकांना सोबत घेत त्यांनी थेट मुंबई गाठली. त्यांच्यासोबत अरुण पाचपुते, राकेश पाचपुते, संजय काळे, प्रा. सुनील माने, युवराज चितळकर, योगेश भोईटे, राहुल पाचपुते, कोळगावचे हेमंत नलगे, सुधीर लगड, अमित लगड, बेलवंडीचे संग्राम पवार उपस्थितीत होते.

Anuradha Nagwade called on Revenue Minister Balasaheb Thorat
अनुराधा नागवडे यांची चहाच्या गोड घोटापासून आमदारकीची तयारी

महसुलमंत्री थोरात यांच्याशी चर्चा करताना नागवडे यांनी विशेषत: काष्टीतील व्यथा मांडली. त्या म्हणाल्या काष्टी हे श्रीगोंदे तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून तेथील अर्थकारण मोठे आहे. व्यापाऱ्यांवर सणासुदीच्या दिवसात संकट आले आहे. दोन वर्षे झाली कर्जे फिटत नाहीत. काष्टीत जे कोरोना रुग्ण दाखवले आहेत ते गावातील नसल्याने हा अन्याय जास्त आहे, असे अनुराधा नागवडे यांनी स्पष्ट केले.

त्यांनी महसूल मंत्र्यांना विनवनी केली की, आपण लक्ष घालून काष्टीसह इतर गावातील लॉकडाऊन उठवाव अशी विनवणी केली. त्यावर थोरात यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याशी चर्चा करीत काय करता येवू शकते याची माहिती घेतली. यात काही सूट नियमात बसवून देता येत असली तर पहा आणि 13 ऑक्टोबरनंतर कुठल्याही परिस्थितीत लॉकडाऊन होवू नये याची खबरदारी प्रशासन व नागरिकांनी घ्यावी, असेही थोरात यांनी सांगितल्याची माहिती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय काळे यांनी दिली.

Related Stories

No stories found.