योगायोगाचे दुसरे नाव म्हणजे बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांच्या महसूल मंत्री पदाच्या पहिल्या कारकिर्दीत तर वास्तूचे लोकार्पण थोरात यांच्याच दुसऱ्या महसूल मंत्री पदाच्या कारकिर्दीत झाले.
 Balasaheb Thorat

Balasaheb Thorat

Sarkarnama

अहमदनगर : अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाचा लोकार्पण सोहळा आज झाला. या वास्तूचे भूमिपूजन बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांच्या महसूल मंत्री पदाच्या पहिल्या कारकिर्दीत तर वास्तूचे लोकार्पण थोरात यांच्याच दुसऱ्या महसूल मंत्री पदाच्या कारकिर्दीत झाले. Another name for Yoga Yog is Balasaheb Thorat

या कार्यक्रमाला राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार सुधीर तांबे, लहू कानडे, बबनराव पाचपुते, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, महापौर रोहिणी शेंडगे, राज्याचे आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, बिजमाता राहिबाई पोपेरे, नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित आदी अधिकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

<div class="paragraphs"><p> Balasaheb Thorat </p></div>
बाळासाहेब थोरात म्हणाले, विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवार सोनिया गांधी ठरवतील...

या प्रसंगी मंत्री गडाख म्हणाले, या वास्तूचे भूमिपूजन थोरात यांनी महसूल मंत्री असताना केले होते. 8 वर्षानंतर याच वास्तूचे लोकार्पणही त्यांच्या महसूल मंत्री पदाच्या कारकिर्दीत होत आहे. प्रत्येक मंत्र्याला वाटते की आपण सुरू केलेले काम आपल्याच कार्यकाळात पूर्ण व्हावे पण असे सर्वांचेच होते असे नाही. बाळासाहेब थोरात यांना योगायोगाने बरेच काही साध्य झाले आहे. योगायोगाचे दुसरे नाव बाळासाहेब थोरात आहे. त्यांचा एखादी गोष्ट व्हावीच असा अट्टाहास नसतो. म्हणून त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मला जावेसे वाटते.

<div class="paragraphs"><p> Balasaheb Thorat </p></div>
बाळासाहेब थोरात म्हणाले, शेतकऱ्यांसमोर अहंकारी केंद्र सरकार झुकले...

जिल्हाधिकारी भोसले यांना उद्देशून मंत्री गडाख म्हणाले, जुन्या घरातून नवीन घरात जाताना माणूस द्विधा मनस्थितीत असतो. मात्र जिल्हाधिकारी साहेब आता तुम्ही जुन्या कार्यालयात राहू नका. तुमचे जुने कार्यालय ज्या विभागांना स्वत:ची कार्यालये नाहीत, अशा विभागांच्या कार्यालयांना द्या, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com