Maan News : आमदार गोरेंच्या गाडीला पुन्हा अपघात...

Jaykumar Gore म्हसवड येथे इफ्तार पार्टीसाठी भाजप जयकुमार गोरे हे आपल्या कार्यकर्त्यांसह निघाले होते.
MLA Jaykumar Gore
MLA Jaykumar Goresarkarnama

Maan News : भाजप BJP आमदार जयकुमार गोरे Jaykumar Gore यांच्या गाडीला काल (शुक्रवार) रात्री आठच्या सुमारास गोंदवले बुद्रुक येथील चौकात अपघात झाला. अपघातामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले असून या गाडीत आमदार गोरे यांचे कार्यकर्ते बसले होते.

म्हसवड येथे इफ्तार पार्टीसाठी भाजप आमदार जयकुमार गोरे हे आपल्या कार्यकर्त्यांसह निघाले होते. त्यांच्या पाठीमागे असलेल्या दुसऱ्या गाडीतून (MH11 CZ 100) कार्यकर्तेही म्हसवडकडे निघाले होते. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास या गाड्यांचा ताफा गोंदवले बुद्रुक येथील मुख्य चौकात आला.

त्यावेळी नेहमीप्रमाणे चौकात वाहतूक कोंडी झालेली होती. या कोंडीतून मार्ग काढून आमदार गोरे यांची गाडी पुढे गेली. मात्र, त्यांच्या गाडीला लागूनच असलेल्या दुसऱ्या गाडीला मुंबईकडे निघालेल्या ट्रॅव्हल्सने जोरदार धडक दिली.

MLA Jaykumar Gore
Satara News : महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या; सातारा, कराड, माण-खटावचे प्रांत बदलले

गर्दीत समोरासमोर आलेल्या वाहनांमुळे रस्ता रिकामा करण्यासाठी ट्रॅव्हल्स मागे घेताना गोरेंच्या गाडीच्या पुढील दारावर जोरदार धडक बसली. ही धडक इतकी जोरात होती की, आमदार गोरेंचे वाहन काही फूट ढकलली गेले. या अपघातात वाहनाचे नुकसान झाले असले तरी मोठा अनर्थ मात्र टळला. या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.

MLA Jaykumar Gore
MLA Jaykumar Gore Accident : जयकुमार गोरे यांच्या गाडीचा अपघात नेमका कसा झाला?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com