नाराज असलेले विखे-राजळे दिसले एकाच व्यासपीठावर...

अनेक दिवसांच्या कालखंडानंतर एकमेकांवर नाराज असलेले खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( MP Dr. Sujay Vikhe Patil ) व आमदार मोनिका राजळे ( MLA Monica Rajale ) एकत्र दिसले.
नाराज असलेले विखे-राजळे दिसले एकाच व्यासपीठावर...
Vikhe-Rajale appeared on the same platformSarkarnama

उमेश मोरगावकर

पाथर्डी (अहमदनगर) : पाथर्डीत काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी व डॉ. विखे पाटील फाउंडेशन संचलित जिल्हा अपंग (दिव्यांग) पुनर्वसन केंद्र व जिल्हा समाज कल्याण विभागातर्फे राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत मोफत सहायक साधने वाटप शिबिर झाले. या निमित्त अनेक दिवसांच्या कालखंडानंतर एकमेकांवर नाराज असलेले खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार मोनिका राजळे एकत्र दिसले. त्यामुळे हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर दिसल्याने भाजप वर्तुळात तो चर्चेचा विषय ठरला. Annoyed Vikhe-Rajale appeared on the same platform...

खासदार व आमदार गटात राजकीय मनोमिलन झाले की पक्षीय कार्यक्रमानिमित्त हे दोघे एकत्र आले, हे मात्र समजू शकले नाही. मध्यंतरी झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे व राजळे गटात दुरावा निर्माण झाला होता. या निवडणुकीत राजळे यांना विश्वासात न घेता विखे यांनी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांना उमेदवारी दिली होती. आपल्याला विश्वासात न घेता ही उमेदवारी विखे यांनी जाहीर केल्याने या दोघांत दुरावा निर्माण झाला होता.

Vikhe-Rajale appeared on the same platform
विरोधकांचा निधी वळविला जातोय ! आमदार मोनिका राजळे यांची सरकारवर टीका

निवडणुकीत आव्हाड यांनी माघार घेतली असली, तरीही त्यानंतर विखे व राजळे यांनी एकही एकत्रित कार्यक्रम घेतला नव्हता. विखे हे त्यानंतर अनेकदा तालुक्यात आले. मात्र राजळे त्यांच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या नव्हत्या, तर राजळे यांनीही अनेक कार्यक्रम घेतले. त्यासाठी त्यांनी विखे यांना बोलावले नव्हते.

विखे यांच्या पुढाकारातून स्वतंत्र भारताचा अमृत महोत्सव व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात दोन दिवसीय आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या निमित्ताने विखे व राजळे आज एकत्र आले. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी मोठा हार घालून त्यांचे स्वागत केले. दोघांनीही भाषणबाजी टाळत रुग्ण व आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत निघून जाने पसंद केले.

Vikhe-Rajale appeared on the same platform
सुजय विखे म्हणाले, अजित पवारांच्या आदेशानेच नगर जिल्ह्यातील गावांत लॉकडाऊन

दुसऱ्यांदा छापल्या कार्यक्रम पत्रिका

शिबिरासाठी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या कार्यालयातून अगोदर ज्या पत्रिका छापण्यात आल्या, त्या पत्रिकेवर आमदार राजळे यांचे छायाचित्र टाकण्यात आले नसल्याने राजळे समर्थक नाराज झाले होते. ही नाराजी समजल्यानंतर विखे यांच्या कार्यालयातून पुन्हा वेगळ्या पत्रिका छापण्यात आल्या. त्यावर राजळे यांचे छायाचित्र छापण्यात आले.

Related Stories

No stories found.