अण्णा हजारे यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र

हिवाळी अधिवेशनात लोकायुक्त कायद्याचा मसुदा मांडावा, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ( Anna Hazare ) यांनी केले.
Anna Hazare
Anna HazareSarkarnama

Anna Hazare : भ्रष्टाचाराला आळा घालणारा लोकायुक्त कायदा जर राज्यात आला, तर राज्यातील भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. त्यामुळे आगामी हिवाळी अधिवेशनात लोकायुक्त कायद्याचा मसुदा मांडावा, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ( Anna Hazare ) यांनी केले.

‘सकाळ’शी बोलताना हजारे म्हणाले, की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्याच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकायुक्तसारखा चांगला कायदा अस्तित्वात येत आहे. या कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी मागील तीन वर्षांपासून मसुदा समितीच्या बैठका झाल्या होत्या. आता या कायद्याचा अंतिम मसुदा तयार झाला असून, तो राज्य सरकारकडे सादर केला आहे. त्यामुळे आता त्याचे कायद्यात रूपांतर होणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे, हा मसुदा अधिवेशनात मांडण्याची मागणी केली आहे. हा कायदा झाला, तर राज्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे, असेही हजारे म्हणाले.

Anna Hazare
video : Anna Hazare पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात

देशाला २६ जानेवारी १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. देशाच्या तिजोरीचे मालक आपण झालो आहोत. या तिजोरीतील पैसा कसा व कोठे खर्च केला जातो, याची माहिती जनतेला असणे गरजेचे आहे. यासाठी जनतेसह आपण सलग आठ वर्षे लढाई केली आणि त्यातून माहिती अधिकाराचा कायदा अस्तित्वात आला. सतरा वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेला हा कायदा आता तारुण्यात आला आहे. त्यामुळे जनतासुद्धा या कायद्याबाबत सज्ञान झाली आहे. आता लोकायुक्त कायदा हा माहिती अधिकाराचे पुढचे पाऊल आहे, असे शेवटी हजारे म्हणाले.

Anna Hazare
लोकायुक्त कायदा करा अन्यथा पायउतार व्हा : अण्णा हजारे पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात

लोकायुक्त कायद्यान्वये राज्यातील कोणतीही सामान्यातील सामान्य व्यक्ती, इतकेच नव्हे तर झोपडीत राहणारी व्यक्तीही भ्रष्टाचार करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात चौकशीची मागणी करू शकते. हा अतिशय चांगला कायदा आहे. तो राज्यात नव्याने तयार होत आहे, ही जनतेच्या दृष्टीने चांगली बाब आहे.

- अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com