मॉलमध्ये वाईन विकण्याचा सरकार विचार करणार नाही : अण्णा हजारेंना विश्वास

राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या वाईन विषयक वक्तव्याला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ( Anna Hazare ) यांनी विरोध केला आहे.
Anna Hazare News Updates
Anna Hazare News UpdatesSarkarnama

Anna Hazare : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी मॉलमध्ये वाईन विक्रीचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे वक्तव्य राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केलं होतं... त्याला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ( Anna Hazare ) यांनी विरोध केला आहे. मॉल संस्कृती भारतीय नाही. मॉलमध्ये वाईन विकू नये. आत्ताचे सरकार याचा विचार करणार नाही, असा विश्वास अण्णांना वाटतो मात्र तसे झाले तर आम्हाला आमच्या मार्गाने जावं लागेल असा इशारा हजारे यांनी दिला आहे.

Anna Hazare News Updates
video : Anna Hazare पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात

अण्णा हजारे म्हणाले, मॉल संस्कृती भारतीय संस्कृती नाही. ही कोठून तरी विदेशी मॉल संस्कृती आली. ही विदेशातील संस्कृती नको ते विकायला ठेवायचं. हे बरोबर नाही, असे त्यांनी सांगितले. मला शाश्वती आहे हे राज्यात आलेले सरकार मॉल, दारू याचा विचार करणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Anna Hazare News Updates
अण्णा हजारे केजरीवालांना म्हणाले, तुम्ही सत्तेच्या नशेत बुडाला आहात

ते पुढे म्हणाले की, तरीही मॉलमध्ये दारू विक्रीसाठी ठेवल्यास नाईलाजास्तव आम्हाला त्या मार्गाने जावे लागेल. मॉलमध्ये दारू विक्री अजून आली नाही. मॉलमध्ये दारू विक्रीस आल्यावर आम्ही आंदोलन करू. मॉलमध्ये नशा येणारे पदार्थ ठेवणे ही आमची संस्कृती नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com