आणि.. आम्ही करेक्ट कार्यक्रम केला : फडणवीसांनी मविआ'ला डिवचलं...

Devendra Fadanvis | त्या सभेत बोलताना चोवीस गावांना पाणी देणारी मंगळवेढा उपसा सिंचन योजना करणार असल्याचं आश्वासन मी दिल होतं.
Devendra Fadanvis |
Devendra Fadanvis |

Devendra Fadanvis| पंढरपूर : तुमच्या आशीर्वादाने आम्ही १०६ जणांनी करेक्ट कार्यक्रम केला, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला डिवचलं आहे. सोलापुरमधील मंगळवेढा येथे आवताडे शुगर्स प्रथम गळीत हंगाम शुभारंभ व शेतकरी मेळाव्यास आज (४ नोव्हेंबर) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

''मला आठवतं की आमचे सुधाकरपंत परिचारक निवडणुकीला उभे होते आणि मी त्यांच्या प्रचारासाठी आलो होतो. त्या सभेत बोलताना चोवीस गावांना पाणी देणारी मंगळवेढा उपसा सिंचन योजना करणार असल्याचं आश्वासन मी दिल होतं. पण त्यानंतर नेमक आमचं सरकार पडलं. पण मी सांगितलं होतं मी पुन्हा येईन आणि तुमची योजनाही मी पुन्हा यायची वाट पाहत बसली. मधल्या काळात सत्तेत असलेल्या सरकारने फाईल सरकवली सुद्धा नाही. अशी टीका देवेंद्र फडणीस यांनी केली.

Devendra Fadanvis |
Gujarat Assembly Elections : आम आदमी पक्षाने जाहीर केला गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार

याचवेळी, तुमच्या आशिर्वादाने समाधान दादा निवडूण आले आणि त्याही सभेत मी आश्वासन दिलं की मी हे काम करणार, आणि मला आनंद आहे की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने १०६ द्या करेक्ट कार्यक्रम आम्ही करतो, असे मी बोललो होते. त्याप्रमाणे आम्ही करेक्ट कार्यक्रम केला. तुमच्या आशिर्वादाने सरकार आलं, अशा टोला महाविकास आघाडीला लगावला आहे. पांडुरंगाच्या आशीर्वादाने सरकार आलं. सरकार आल्याबरोबर आपण या योजनेला मोठ्याप्रमाणात गती दिली.”

आपलं सरकार सत्तेत येताच आपण त्या योजनेचा मोठ्या प्रमाणात गती दिली. समाधान परिचारक यांनीही चांगला पाठपुरावा केला. आता या योजनेसंदर्भातील सर्व मान्यता आपण घेतल्या आहेत. मला सांगताना आनंद वाटतोय, त्यासंदर्भातल्या सर्व प्रक्रिया पुर्ण झाल्या. पण गेल्या चार-पाच वर्षात लोखंडाच्या आणि इतर वस्तुंच्या किमती फार वाढल्या आहेत. ते पाहता नियोजन विभागाने त्यात नवीन दरसुचीप्रमाणे याचे प्राकलन तयार करण्याच्या सुचना दिल्या आहेत. नवीन दराने प्राकलन येताच त्याला कॅबिनेटमध्ये मंजूरी देऊ. त्यानंतर हा २४ गावांना पाणी देणारा मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा प्रश्न सुटेल, तुम्हाला लोकांपुढे ताठ मानेने जाता येईल, असा विश्वास यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in