अन्‌ मंत्री शंभूराज देसाईंच्या मातोश्रींच्या डोळ्यात अश्रू तरळले...

कॅबिनेट मंत्रीपदी Cabinet Minister निवड झाल्यानंतर शंभूराज देसाई Shambhuraj Desai यांनी गुरुवारी मंत्रालयातील Mantralaya आपल्या नवीन दालनात प्रवेश केला.
Vijayadevi Desai, Shambhuraj Desai
Vijayadevi Desai, Shambhuraj Desaisarkarnama

सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्रीपद मिळालेले पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी काल (गुरुवारी) मंत्रालयातील आपल्या दालनात प्रवेश केला. प्रवेशापूर्वी या नवीन दालनाचे उद्घाटन मातोश्री विजयादेवी देसाई यांच्या हस्ते करून त्यांचे आशीर्वाद घेत कामकाजास सुरुवात केली. मंत्रालयातल्या नवीन दालनात आपले बोट धरून चाललेल्या या कर्तृत्ववान पुत्राकडे पाहून मातोश्री विजयादेवी यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

तब्बल चार दशकांनंतर देसाई कुटुंबातील व्यक्तीला कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याने पाटणवासियात आनंद व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर देसाई कुटुंबिय भावुकझाले आहे. शपथविधीनंतर मंत्रालयातील दालनात प्रवेश ही तशी नेहमीची घटना असते. पण राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी कॅबिनेट मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर गुरुवारी (ता. ८) मंत्रालयातील आपल्या नवीन दालनातील प्रवेशाला भावनिक किनार लावली.

मंत्री देसाई यांनी मंत्रालयातील आपल्या नवीन दालनाचे उद्घाटन मातोश्री विजयादेवी देसाई यांच्या हस्ते करून त्यांचे आशीर्वाद घेत कामकाजास सुरुवात केली. त्यांनी घालून दिलेल्या मातृभक्तीच्या या अनोख्या वस्तुपाठाने मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधींमध्ये कौतुकाची भावना निर्माण झाली. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा वारसा लाभलेले शंभूराज देसाई यांच्या रूपाने तब्बल 42 वर्षांनंतर पाटणला कॅबिनेट मंत्रीपद लाभले आहे.

Vijayadevi Desai, Shambhuraj Desai
Shivsena : शिंदेंच्या नेतृत्वखालील शिवसेनाच थोरली... शंभूराज देसाई

राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्यानंतर शंभूराज देसाई यांनी गुरुवारी मंत्रालयातील आपल्या नवीन दालनात प्रवेश केला. या नवीन दालनाचं उद्घाटन त्यांनी आपल्या मातोश्री विजयादेवी देसाई यांच्या हस्ते करत त्यांचे आशीर्वाद घेऊन कामकाजास सुरुवात केली. आपल्या आईच्या हातून मंत्रालय दालनाचं उद्घाटन करणारे ते महाराष्ट्रातील कदाचित पहिलेच मंत्री आहेत. दालनाच्या उद्घाटनप्रसंगी विजयादेवी यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

Vijayadevi Desai, Shambhuraj Desai
शिवसेनेवर एकनाथ शिंदेंचाच हक्क : संपत्तीला वारस असतो, पक्षाला नाही - मुनगंटीवार

वडील आबासाहेब अर्थात शिवाजीराव देसाई यांच्या अकस्मित निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी सांभाळत शंभूराज देसाई यांनी जनसेवेचा मार्ग धरला. पाटणच्या जनतेनेही त्यांना प्रेम दिले. अभ्यासू वृत्ती, धडाडी आणि मेहनत यांमुळे त्यांनी राजकारणात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांचे आजोबा लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्याप्रमाणे प्रत्येक प्रश्नाची व्यापक जाण, दूरदृष्टी आणि जनसामान्यांच्या हिताची तळमळ जुन्याजाणत्यांना त्यांच्यात दिसते.

Vijayadevi Desai, Shambhuraj Desai
Teachers Day : एकनाथ शिंदेंचा राज्यातील शिक्षकांशी संवाद

कै. शिवाजीराव देसाई यांची देखील आपल्या मुलाने लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्याप्रमाणे कर्तृत्व गाजवावे, अशी इच्छा होती. कॅबिनेट मंत्रीपदी विराजमान होऊन शंभूराज देसाई यांनी ती पूर्ण केली आहे. तीन पिढ्यांनंतर देसाई कुटुंबात कॅबिनेट मंत्रीपद आले आहे. गुरुवारी कॅबिनेट मंत्री म्हणून मंत्रालयातल्या नवीन दालनात आपले बोट धरून चाललेल्या या कर्तृत्ववान पुत्राकडे पाहून मातोश्री विजयादेवी यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. सर्व कुटुंबीय व हितचिंतकांच्या उपस्थितीत होत असलेला हा दालन प्रवेश पाहून त्या काहीशा भावुक झाल्या होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in