... अनं मी लग्ना आधीच साखर कारखान्याचा चेअरमन झालो

मंत्री शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) यांची पहिली निवडणूक व त्यांचा राजकारणातील प्रवेश कसा अचानक झाला याबाबत त्यांनी स्वतः एका समारंभात सांगितले.
Shankarrao gadakh
Shankarrao gadakhSarkarnama

अहमदनगर - राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) यांची पहिली निवडणूक व त्यांचा राजकारणातील प्रवेश कसा अचानक झाला याबाबत त्यांनी स्वतः एका समारंभात सांगितले. सहकार हा माझा आवडीचा विषय असल्याचेही त्यांनी नमुद केले. ... And before I got married, I became the chairman of a sugar factory

पारनेर तालुक्यातील पठारवाडी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी माजी आमदार विजय औटी, शिवसेनेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रा. शशिकांत गाडे, काशिनाथ दाते, संदेश कार्ले, रामदास भोसले, किसनराव सुपेकर आदी उपस्थित होते.

Shankarrao gadakh
शंकरराव गडाख म्हणाले, पारनेरकरांनी मंत्री पदाची संधी हुकवली...

शंकरराव गडाख म्हणाले, सहकार माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. माझी राजकीय सुरवात वयाच्या 24व्या वर्षी कॉलेज शिक्षण संपताच झाली. माझे वडील यशवंतराव गडाख यांना लोकसभा निवडीच्या वेळी काही अडचणी आल्या आणि तत्कालिन मुख्य निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन यांनी यशवंतराव गडाख यांना 4 वर्षांसाठी निवडणुकीपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे माझे लग्न झालेले नसताना वयाच्या 24व्या वर्षी साखर कारखान्याचा चेअरमन झालो.

ते पुढे म्हणाले, कोणतीही संस्था असू द्या ती छोटी असो अथवा मोठी ती चालविणे सोपं नसतं. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद तशा सोप्या संस्था पण सहकारी संस्था शेतकऱ्यांच्या प्रपंचाशी निगडीत असतात. यात आर्थिक व्यवहार समजून घ्यावा लागतो. आपल्या निर्णयावर शेतकऱ्यांचा प्रपंच अवलंबून असतो. मला अनेक वर्ष लागले समजायला. यशवंतराव गडाख यांचा आशीर्वाद होते, अनुभव होता. पुढे ज्यावेळी मी बँकेचा संचालक झालो, त्यावेळी बँकेचा कारभार पाहिला. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही आशिया खंडात नावाजलेली बँक समजली जाते. अनेक क्रांतिकारी व शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा झाला. एक वेळ महाराष्ट्रात सर्वाधिक दूध उत्पादन करणारा जिल्हा अशी अहमदनगर जिल्ह्याची ओळख बनली होती. त्यामागे जिल्हा सहकारी बँक होती.

Shankarrao gadakh
पवार - गडाख यांच्या जुन्या संबंधांमुळे शंकरराव गडाखांच्या पंखात बळ...

सगळे वर्ष शेतकऱ्यांसाठी सारखे नसतात. निसर्ग व परिस्थितीच्या दुष्ट चक्रातून सहकारी संस्था व शेतकऱ्यांना काम करावे लागते. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. राज्य सरकारने स्थापनेनंतर सर्वात प्रथम शेतकरी कर्जमाफीचे काम केले. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही लवकरच दिलासा दिला जाईल, असे ही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com