जुन्नरमध्ये पतसंस्थेवर दरोडा; गोळीबारात व्यवस्थापकाचा खून

अनंत ग्रामीण पतसंस्थेवर आज दुपारच्या सुमारास दरोडा टाकला.
जुन्नरमध्ये पतसंस्थेवर दरोडा; गोळीबारात व्यवस्थापकाचा खून
RobberySarkarnama

जुन्नर : शिरुर तालुक्यातील पिंपरखेडमधील महाराष्ट्र बँकेच्या दरोड्याची घटना ताजी असताना जुन्नरमध्ये एका पतसंस्थेवर दरोडा पडला आहे. तालुक्यातील १४ नंबर फाट्यावर २ दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवत अनंत ग्रामीण पतसंस्थेवर आज दुपारच्या सुमारास दरोडा टाकला. या दरोड्यामध्ये दरोडेखोरांनी गोळीबारही केला. यात बँक व्यवस्थापक दशरथ भोर यांचा खून झाला आहे.

याबाबत पतसंस्थेचे अध्यक्ष विक्रम भोर यांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, जुन्नरमधील पुणे नाशिक महामार्गालगत चौदा नंबर फाट्यावर अनंत ग्रामीण सहकारी पतसंस्थेत आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात सशस्त्र तरुणांनी हेल्मेट घालून प्रवेश केला. यावेळी पतसंस्थेत व्यवस्थापक दशरथ भोर आणि महिला कर्मचारी हजर होते. या तरुणांनी पिस्तूलाचा धाक दाखवून भोर यांच्याकडे पैशाची मागणी केली. मात्र पैसे देण्यास विरोध केल्याने भोर यांना गोळी घालून पतसंस्थेतील सुमारे अडीच लाख रुपयांची रक्कम घेऊन दरोडेखोरांनी मोटारसायकलवरून नारायणगावच्या दिशेने पळ काढला.

Robbery
पवार म्हणाले, शशिकांत शिंदेंनी निवडणूक गांभीर्यांने घ्यायला हवी होती...

यानंतर भोर यांना उपचारासाठी नारायणगावला नेत असताना उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच नारायणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास देशपांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले. त्यांना दरोडेखोरांचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देशपांडे आणि त्यांचे पथक करत आहेत. या घटनेचा पोलिसांनी तातडीने तपास करून आरोपींना अटक करावी अशी मागणी विक्रम भोर यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in