आनंदराव पाटलांनी घेतली अजित पवारांची भेट : बंद खोलीत केली अर्धा तास चर्चा

श्री. पाटील Anandrao Patil हे काँग्रेसचे Congress माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan यांचे निकटवर्तीय होते. मात्र, विधानसभा Vidhansabha निवडणुकीत त्यांच्यात फारकत घेतल्याने ते श्री. चव्हाण गटापासून दुरावले आहेत.
Ajit Pawar, Anandrao Patil
Ajit Pawar, Anandrao Patilsarkarnama

कऱ्हाड : उपमुख्यमंत्री अजित पवार कराड, पाटण तालुक्यांच्या दौऱ्यावर आहेत. रात्री पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या ते घरी भोजनासाठी आले होते. त्यावेळी माजी आमदार आनंदराव पाटील यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. त्यावेळी उपमुख्यमंत्री पवार व आनंदराव पाटील यांच्यात अर्धा तास बंद खोलीत चर्चा झाली. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील ही उपस्थित होते. आगामी जिल्हा परिषदेसह पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या चर्चेला विशेष महत्त्‍व प्राप्त झाले आहे.

उपमुख्यमंत्री पवार हे कोयनानगरात आज होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटपाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ते रात्री कराड येथे मुक्कामी आले होते. ते भोजनासाठी पालकमंत्री पाटील यांच्या घरी गेले होते. त्यावेळी माजी आमदार आनंदराव पाटील उपस्थित होते.

Ajit Pawar, Anandrao Patil
Video: शेतकऱ्यांनो टोकाची भूमिका घेऊ नका; अजित पवार

या वेळी तिघांत बंद खोलीत सुमारे अर्धा तास चर्चा झाली. पालिकेसह जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यात चर्चा झाल्याची कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज होती. मात्र, नेमकी चर्चा काय झाली, त्याची माहिती मिळाली नाही. पाटील हे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय होते.

Ajit Pawar, Anandrao Patil
Sadabhau Khot : ..तर पवारांचे नाव लावणार नाही, म्हणणारे अजित पवार कोण ? महाराष्ट्राला कळू द्या..

मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांच्यात फारकत घेतल्याने ते श्री. चव्हाण गटापासून दुरावले आहेत. विधानसभेलाही आमदार पाटील यांनी वेगळी भूमिका घेतल्याने त्यांच्यात दरी निर्माण झाली होती. पाटील हे भाजपच्या संपर्कात असून भाजपचे नेते अतुल भोसले हे त्यांच्या अनेक कार्यक्रमाला उपस्थित राहतात. त्याबरोबरच जिल्हा बॅंक निवडणुकीपासून पाटील हे पालकमंत्री पाटील व राष्ट्रवादीसोबत होत. त्याचाच एक भाग म्हणून आज उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला आनंदराव पाटील उपस्थित राहिले, त्यामुळे वेगळ्या राजकिय चर्चेला उधाण आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com