संतप्त शिवसैनिकाचा खासदार लोखंडेंना सवाल : माझ्या मताचा सौदा केवढ्याला केला?

शिर्डीचे खासदार लोखंडे ( Sadashiv Lokhande ) हे शिंदे गटात गेल्यापासून शिवसैनिकांत तीव्र संताप आहे.
Shivsena MP Sadashiv Lokhande
Shivsena MP Sadashiv Lokhande Sarkarnama

अहमदनगर - शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे ( Sadashiv Lokhande ) हे शिंदे गटात गेल्यापासून शिवसैनिकांत तीव्र संताप आहे. शिवसेनेचे अहमदनगर उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी लोखंडे यांना खुले आव्हान दिले आहे. तर एका शिवसैनिकाने चक्क लोखंडे यांचे खासगी सचिव शिवाजी दिशागर यांना फोन करून, 'खासदारांनी माझ्या मताचा सौदा केवढ्याला केला?', असा जाबच विचारला आहे. या संवादाची ऑडिओ क्लिप आज जोरदार व्हायरल होत आहे. सचिन औटी असे शिवसैनिकाचे नाव आहे. Shivsena News Update

सचिन औटी यांनी शिवाजी दिशागर यांना अनेक दिवसांपासून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र हा संपर्क होऊ शकत नव्हता. या बाबत औटी यांनी दिशागर यांना विचारणा केली. यावर दिशागर यांनी सांगितले की 'माझा मोबाईल स्विच ऑफ होता.' यावर औटींना सांगितले की, 'तुम्ही एका जबाबदार लोक प्रतिनिधींचे खासगी सचिव आहात.'

Shivsena MP Sadashiv Lokhande
असा झाला सदाशिव लोखंडेंचा चेंबूर ते शिर्डी राजकीय प्रवास

यावर दिशागर म्हणाले, 'मला काम सांगा. मी कोणत्या कारणासाठी फोन बंद ठेवला हे नंतर सांगतो.' यावर औटी म्हणाले, 'तुम्ही आम्हाला दम देता आहात का? मी कामच सांगत आहे. माझ्या मताचा सौदा खासदार साहेबांनी किती रुपयांना केला,' असे विचारताच दिशागर यांनी 'मला सांगता येणार नाही,' असे स्पष्ट केले.

'लोखंडे फोन उचलत नाहीत. तुम्हीही फोन घेत नाहीत. तुमच्यावर नक्की जबाबदारी काय आहे,' असा सवालच औटींनी विचारला. यावर दिशागर यांनी सांगितले की, 'मी परभणीला आहे. माझे वडील आजारी आहेत. मी मागील गुरुवारपासून परभणीत आहे,' असे स्पष्ट केले.

Shivsena MP Sadashiv Lokhande
खासदार लोखंडे यांचा एकदा नव्हे तर चौथ्यांदा नवा घरोबा!

यावर संतप्त औटींनी विचारले की, 'तुमचे वडील आजारी आहेत. पण लोखंडे साहेब किंवा त्यांच्या घरातील कोणी आजारी नाही ना. मग फोन का उचलत नाहीत. आमची मते केवढ्याला विकली हे त्यांना सांगावे लागेल. आमचा निरोप त्यांना द्या,' असे औटींनी खडसावून सांगितले.

ही क्लिप सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. शिर्डी मतदार संघात सध्या लोखंडे यांच्या विरोधात तीव्र संताप आहे. जिल्हा प्रमुखापासून सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांत तीव्र नाराजी आहे. शिंदे गटाने राज्यात सरकार बनविण्याच्या हलचाली सुरू करताच लोखंडे यांनी शिंदे गटा विरोधात शिर्डीत आंदोलन केले होते. त्या आंदोलनानंतर आठवड्याभरात ते शिंदे गटात गेले. लोखंडे हे मूळचे भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते. त्यांनी कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघातून चार वेळा भाजपकडून निवडणूक लढविली. यातील तीन वेळा ते आमदार होते. त्यांनी मनसेत प्रवेश करत कुर्ला विधानसभा मतदार संघातूनही निवडणूक लढविली त्यात ते पराभूत झाले. त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत शिर्डी लोकसभा मतदार संघातून दोन वेळा निवडणूक लढवत खासदारकी मिळविली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in