अमित शहांनी कर्नाटक सरकारला कारवाईचे आदेश द्यावेत

महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Dilip Walse Patil ) व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी ट्विट करत भाजपवर टीका केली
अमित शहांनी कर्नाटक सरकारला कारवाईचे आदेश द्यावेत
Dilip Walse Patilsarkarnama

अहमदनगर : कर्नाटक राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची समाजकंटकांनी विटंबना केली. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रवरानगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुणगान गायिले. यावर महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Dilip Walse Patil ) व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी ट्विट करत भाजप टीका करताना नागरिकांना सय्यम बाळगण्याचे आवाहन केले आहे. Amit Shah should order the Karnataka government to take action

केंद्रीय मंत्री अमित शहा हे अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगरला आले होते. या प्रसंगी ते म्हणाले होते की, हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची ही भूमी आहे. या भुमीवर भाषण करण्याचे मी बोलत आहे. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य प्राप्ती केली. त्यातून स्वदेश, स्वधर्म व स्वभाषेचा पाया रचला. या पायावर आपण उभे आहोत. त्यांच्या विचारांच्या पायावर देश मजबुतीने उभा आहे, असे गौरवोद्गार अमित शहा यांनी काढले होते.

Dilip Walse Patil
अडचणीतील राष्ट्रवादीसाठी दिलीप वळसे पाटील संकटमोचक बनले!

कर्नाटकात भाजपचे सरकार आहे. कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्यावर तेथील मुख्यमंत्र्यांनी ही घटना छोटी आहे, असे म्हटले होते. यावर महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्विट केले की, आजच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अहमदनगर येथे छत्रपतींच्या भूमीत आल्याचा आनंद व्यक्त केला. आता त्यांनी कर्नाटक सरकारला या निंदनीय घटनेतील आरोपींवर तातडीने कारवाई करून कठोर शासन करण्याचे आदेश द्यावेत. कर्नाटक राज्यासहीत महाराष्ट्रातही काही ठिकाणी या घटनेचे पडसाद उमटले आहेत. माझे महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींना आवाहन आहे की, त्यांनी हिंसक प्रतिक्रिया देऊ नये. बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना दुर्दैवी असून मी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करतो, असे वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

Dilip Walse Patil
बाळासाहेब थोरात म्हणाले, शेतकऱ्यांसमोर अहंकारी केंद्र सरकार झुकले...

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करत म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मते मागणाऱ्या भाजपने कायमच शिवरायांचा अवमान केला आहे. बंगळुरूतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याऐवजी ही छोटी घटना आहे, असे म्हणून दोषींना पाठीशी घालणाऱ्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा मी तीव्र निषेध करतो, असे थोरात यांनी म्हटले आहे.

Dilip Walse Patil
नीलेश लंके म्हणाले, मी पाकिस्तानातून आलोय का ?

पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले की, संपूर्ण देशाचे श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा मी निषेध व्यक्त करतो. महापुरूषांच्या अवमान करणाऱ्या दुष्प्रवृत्तीचे समूळ उच्चाटन झाले पाहिजे. या घटने बाबत सरकारने योग्य ते पाऊल उचलले पाहिजे, असे म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.