अप्पा महाडिकांची समजूत कोणी घालायची? मग थेट अमित शहांनी फोन फिरवला..

कोल्हापूर विधान परिषद मतदारसंघातून महाडिकांनी माघार घेणे, हेच आश्चर्याचे ठरले.
अप्पा महाडिकांची समजूत कोणी घालायची? मग थेट अमित शहांनी फोन फिरवला..
Mahadik-Amit ShahSarkarnama

कोल्हापूर : विधान परिषद निवडणुकीत सतेज पाटील (Satej Patil) हे कोल्हापूरातून बिनविरोध निवडीचा निर्णय झाला पण त्यामागे बऱ्याच घडामोडी घडल्या. त्याचे पडसाद कोल्हापूरच्या आगामी राजकारणात उमटणार आहेतच. पण अनेक नव्या आघाड्या आणि समीकरणे यानिमित्ताने पुढे आली आहेत.

पाटील यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले महाडिक घराणे अशा प्रकारे माघार घेईल, याची अनेकांना अपेक्षा नव्हती. महाडिक कुटुंबातील प्रमुख महादेवराव ऊर्फ अप्पा (Mahadevrao Mahadik) यांना हा माघारीचा निर्णय पसंत पडेल का, असा अनेकांपुढे प्रश्न होता. त्यांची समजूत कोणी काढायची, असा गहन प्रश्न होता. माजी मंत्री आणि आमदार विनय कोरे यांनी यात महत्वाची भूमिका बजावली, हे आता पुढे आले आहे. याशिवाय थेट केेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच महाडिक यांच्याशी बोलल्याचे सांगण्यात आले. त्यातूनच महाडिक हे माघारीस तयार झाल्याचे दिसून येते.

Mahadik-Amit Shah
गुलाल सतेज पाटलांच्या अंगावर पडला.. पण किंगमेकर विनय कोरे ठरले!

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे दोन दिवसांपूर्वी दिल्लीत गेले होते. तेथे त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली. पाटील हे समोर असतानाच शहा यांनी थेट धनंजय महाडिक यांच्याशी फोनवरून चर्चा केली. याबाबत महादेवराव महाडिक निर्णय घेतील असे धनंजय यांनी सांगितल्यानंतर श्री. शहा यांनी थेट महादेवराव महाडिक यांच्याशीही चर्चा करून अर्ज मागे घेण्याची विनंती केली. चर्चेत भविष्यातील राजकारणाचा ‘शब्द’ही श्री. शहा यांनी दिल्याचे समजते. शहा-महादेवराव यांच्यात चर्चा झाल्यनंतर अमल यांनी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आणि निवडणूक बिनविरोध झाली.

Mahadik-Amit Shah
मूड महाराष्ट्राचा : आज निवडणूका झाल्यास जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण?

विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांना पाठिंबा दिलेले ‘जनसुराज्य’चे आमदार विनय कोरे हेच श्री. महाडिक यांचा अर्ज मागे घेण्यापासून ते निवडणूक बिनविरोध करण्याच्या चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले. पक्षपातळीवर भाजपने माघार घेण्याचा निर्णय घेतला; पण तो माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यापर्यंत पोहचवून त्यांना माघार घेण्यासाठी राजी करण्याची जबाबदारी श्री. कोरे यांनी पेलेली. यात प्रा. जयंत पाटील यांनीही महत्त्वाची भूमिका बजावल्याचे पडद्यामागील घडामोडींचा अंदाज घेतल्यानंतर स्पष्ट झाले.

Mahadik-Amit Shah
मूड महाराष्ट्राचा : फडणवीस-अजितदादांचा शपथविधी पुन्हा नकोच!

सहा वर्षांपूर्वी झालेल्या याच निवडणुकीत श्री. कोरे यांनी आपल्या बळाचा पट पालकमंत्री पाटील यांच्यामागे लावला होता; पण विधानसभा निवडणुकीनंतर श्री. कोरे यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. राज्यात भाजपसोबत राहू असे त्यांनी गोकुळ निवडणुकीतही जाहीर केले होते. त्याप्रमाणे या निवडणुकीत आमदार कोरे यांनी अमल महाडिक यांना पाठिंबा जाहीर केला होता; पण निवडणूक बिनविरोध होण्यात श्री. कोरे यांचीही मध्यस्थी कामी आल्याचे स्पष्ट झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.