Ambadas Danve : 'भाजप' चा पोरखेळ 'अंधेरी'त उघड झाला

विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे ( Ambadas Danve ) यांनी भाजपवर टीका केली.
Ambadas Danve & Shankarrao Gadakh
Ambadas Danve & Shankarrao GadakhSarkarnama

Ambadas Danve : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून पळ काढणारे 'भाजपा' चे शिलेदार आता सन २०२४ मध्ये अंधेरीची जागा जिंकू म्हणत असल्याने त्यांचा पोरखेळ उघड झाला आहे.हिंमत हारणारे आता काहीही वल्गना करीत असले तरी महाराष्ट्राने पोटनिवडणुकीत जाणीवपूर्वक आणलेल्या अडचणी बघीतल्या आहेत, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे ( Ambadas Danve ) यांनी भाजपवर केली.

सोनई परिसरात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करुन शनिदर्शनासाठी दानवे आले असताना त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. ते पुढे म्हणाले की, आमच्या उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला कोंडीत धरण्याचा डाव भाजपवाले करीत असले तरी त्यांचा रडीचा डाव आम्ही निश्चित हाणून पाडू असे सांगून त्यांनी आमच्या संघर्षांचे फळ भविष्यात गोड असणार आहे, असे सांगितले.

Ambadas Danve & Shankarrao Gadakh
Jalna : दानवे-सत्तार स्थानिक स्वराज्य निवडणुकीत एकमेकांशी दोन हात करणार?

शनिशिंगणापुर येथील पंढरीनाथ दत्तात्रेय बानकर यांच्या कपाशी पीकाचे तर कांगोणीफाटा येथील नितीन भानुदास सोनवणे यांच्या सोयाबीन पीकाची त्यांनी पाहणी केली. यावेळी माजी मंत्री शंकरराव गडाख, शिंगणापूरचे सरपंच बाळासाहेब सोनवणे, 'मुळा'चे संचालक बापुसाहेब शेटे, पोलीस पाटील सयाराम बानकर, शिवसेना तालुकाध्यक्ष मच्छिंद्र म्हस्के, उपाध्यक्ष हरिभाऊ शेळके, मुन्ना चक्रनारायण उपस्थित होते.

Ambadas Danve & Shankarrao Gadakh
पुलाचा श्रेयवाद रंगला : सुनील गडाख म्हणाले, हा तर विरोधकांनी आणलेला बनाव

माजी मंत्री गडाख यांनी तालुक्यातील स्थिती सांगून शेतकऱ्यांना अधिक मदत मिळण्याची सुचना केल्यानंतर दानवे यांनी प्रातांधिकारी श्रीनिवास अर्जुन, जिल्हा कृषी अधिकारी शिवाजी जगताप, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रेय डमाळे यांच्याकडून सद्यस्थितीची माहिती घेतली. बानकर वस्तीवर रावसाहेब बानकर यांनी तर शनिमंदिरात देवस्थानचे उपाध्यक्ष विकास बानकर यांनी त्यांचा सत्कार केला.

दानवे यांच्या दौ-यात सोनईतील व्यापारी उपस्थित होते. महावीर चोपडा यांनी सोनईच्या कौतुकी नदीला पूर येवून व्यापाऱ्यांचे झालेल्या नुकसानीची माहिती दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com