कृष्णप्रकाशांच्या बदलीबरोबरच गेले पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे ग्लॅमरही

नवे आयुक्त अंकुश शिंदे यांनी आयुक्तालयाचा अभ्यास करण्यात व आढावा घेण्यास तब्बल दोन महिने दोन दिवस लावले.
Krishnaprakash and Ankush Shinde
Krishnaprakash and Ankush ShindeSarkarnama

पिंपरी - या ना त्या प्रकारे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला सतत प्रसिद्धीच्या झोतात ठेवून त्याला ग्लॅमर मिळवून देणारे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश तथा केपी यांची बदली झाली. त्यामुळे पोलीस आयुक्त व पोलीस आयुक्तालयाचेही ग्लॅमर हरवले गेल्याचे पहावयास मिळाले. दरम्यान, प्रसिद्धीपराडमुख नवे आयुक्त अंकुश शिंदे यांनी आयुक्तालयाचा अभ्यास करण्यात व आढावा घेण्यास तब्बल दोन महिने दोन दिवस लावल्यानंतर अखेर आज पत्रकारपरिषद घेऊन आपली स्ट्रॅटेजी जाहीर केली. ती त्यांनी पदभार स्वीकारलेल्या दिवशीच म्हणजेच 21 एप्रिलला घेणे अपेक्षित होते. ( Along with the transfer of Krishnaprakash, the glamor of Pimpri-Chinchwad Police Commissionerate also went )

केपींच्या दीड वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी आपले कार्यालयच नव्हे, तर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय इमारत तथा मुख्यालय हे एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीच्या कार्पोरेट ऑफिसारखे बनवले होते. त्यांच्या खुर्चीपासून त्यांच्या कार्यालयाची अंतर्गत रचना त्याला साजेशी त्यांनी केली होती. परिणामी तेथे वावरही तशाच व्यक्तींचा अधिक होता. मात्र नव्या आयुक्तांची साधी राहणी असल्याने त्यांनी आल्याआल्याच आपल्या केबिनचा लुक एकदम बदलला. आलिशान आरामदायक खुर्ची सोडून साध्या लाकडी खुर्चीत बसण्यास सुरवात केली. समोरील आलिशान टेबल व त्यावरील तशीच भव्य काचही त्यांनी बदलली. एवढेच नाही, तर बसण्याची दिशा व जागाही बदलली.

Krishnaprakash and Ankush Shinde
महापालिका निवडणुकीचा अंतिम टप्पा पूर्ण : पिंपरी पालिकेची प्रभागनिहाय मतदार यादी जाहीर

दबंग अशी प्रतिमा निर्माण केलेल्या केपींची 20 एप्रिलला बदली झाली. त्यावेळी ते अमेरिकेत होते. ते येण्यापूर्वीच शिंदेनी दुसऱ्या दिवशीच (ता. 21) आयुक्तपदाचा चार्ज घेतला. त्यावेळी आयुक्तालयाचा अभ्यास करून आढावा घेतल्यानंतर बोलू, कामाचा प्राधान्यक्रम सांगू, असे ते म्हणाले होते. मात्र त्यासाठी त्यांनी चक्क दोन महिने व दोन दिवस घेतले व आज तो सांगितला.

Krishnaprakash and Ankush Shinde
जगताप म्हणाले, ``तिकिट पिंपरी-चिंचवडला आहे, त्यामुळे मतदानाला गेलेच पाहिजे!``

आषाढीवारीत पोलिसांनी पकडलेले सोनसाखळी चोर, केलेली चांगले काम, दरोडाविरोधी पथकाने चार तासांत उघडकीस आणलेला खूनाचा गुन्हा आणि याच पथकाने पोलिसांवर हल्ला करून पळून गेलेल्या दुधानी व टाक या दरोडेखोरांच्या टोळीतील दोघांना केलेली अटक यानिमित्ताने नव्या पोलीस आयुक्तांनी ते काहीसे जुने झाल्यावर पहिली प्रेस कॉन्फरस दोन महिन्यानंतर घेतली. एव्हाना त्यांच्यापूर्वीचे आयुक्त केपी यांच्या किमान दहा पत्रकारपरिषदा या कालावधीत झाल्या असत्या. यावेळी बोलताना त्यांनी स्ट्रीट क्राईम आणि वाढत्या महिलांविषयक गुन्ह्यांना आळा घालण्यास आपले प्राधान्य राहणार असून त्यासाठी स्ट्रॅटेजी तयार करणार असल्याचे सांगितले. वाहतुकीच्या प्रश्नावर सुद्धा लक्ष केंद्रीत करणार आहे, असे ते म्हणाले. नुकतेच एका खुनाच्या गुन्ह्यात अल्पवयीन गुन्हेगाराला ताब्यात घेण्यात आले. इतरही गंभीर गुन्ह्यांत त्यांच्या वाढत्या सहभागाबद्दल त्यांनी यावेळी चिंता व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com