सहकारी कारखाना निवडणुकीत खासगी कारखान्यावरून आरोप-प्रत्यारोप

या निवडणुकीत काँग्रेसचे ( Congress ) ज्येष्ठ नेते राजेंद्र नागवडे ( Rajendra Nagawade ) व भाजपचे ( BJP ) आमदार बबनराव पाचपुते ( Babanrao Pachpute ) यांच्या समर्थकांत लढत आहे.
सहकारी कारखाना निवडणुकीत खासगी कारखान्यावरून आरोप-प्रत्यारोप
Babanrao Pachpute vs. Rajendra NagawadeSarkarnama

श्रीगोंदे ( जि. अहमदनगर ) : श्रीगोंदे तालुक्यातील सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे ( Congress ) ज्येष्ठ नेते राजेंद्र नागवडे ( Rajendra Nagawade )भाजपचे ( BJP ) आमदार बबनराव पाचपुते ( Babanrao Pachpute ) यांच्या समर्थकांत लढत आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करत आरोप-प्रत्यारोपाची मालिकाच सुरू केली आहे. Allegations against private factories in co-operative factory elections

सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सध्या रंगात आली आहे. येत्या 14 जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीत नागवडे विरुध्द पाचपुते या पारंपारिक लढतीत, मगर गटाचीही एन्ट्री झाली आहे. निवडणूक सहकारी साखर कारखान्याची असली तरी प्रचाराचा मुद्दा नेत्यांच्या खासगी कारखान्यांचाच जास्त चर्चिला जात आहे. त्यातच सोशल मीडियात एकमेकांवरच्या चिखलफेक करणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांचा पाऊस पडत आहे.

Babanrao Pachpute vs. Rajendra Nagawade
नागवडे पाचपुतेंना म्हणाले, 'तुम्ही' आमच्यामुळेच आमदार...

कुकडी कारखाना निवडणूक बिनविरोध करीत माजी आमदार राहुल जगताप यांनी निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. त्यामुळे आता सगळ्यांच्या नजरा नागवडे कारखाना निवडणुकीकडे लागल्या आहेत. त्यातच आता राजेंद्र नागवडे यांच्याविरुध्द आमदार बबनराव पाचपुते व केशवराव मगर यांच्या एकीने एल्गार पुकारला आहे. मगर हे पुर्वाश्रमीचे नागवडे यांचे निष्ठावंत असल्याने या लढतीकडे लक्ष आहे. त्यातच आमदार पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा याही निवडणूक रिंगणात असल्याने पाचपुते गट पूर्ण ताकतीनिशी निवडणुकीत उतरल्याचे बोलले जाते.

Babanrao Pachpute vs. Rajendra Nagawade
बबनराव पाचपुते म्हणाले, 'साईकृपा'वर आता गडकरींचा वरदहस्त

दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत. ही निवडणूक सहकारी संस्थेची असली तरी प्रचाराचा रोख मात्र पुन्हा एकदा सहकारी विरुध्द खासगी असा केला जात आहे. राजेंद्र नागवडे हे पाचपुते यांच्या बंद असणाऱ्या साईकृपा खाजगी साखर कारखान्याचा मुद्दा पुढे करुन यांच्या हाती सत्ता देणार का हा प्रश्न करीत आहेत. त्याला पाचपुते समर्थकांनी आता नागवडे यांच्या परभणी येथील खासगी कारखान्याचा मुद्दा उकरुन काढला आहे. नागवडे यांच्या हाती सत्ता दिली तर हा सहकारी कारखाना खासगी होईल, अशी भीती घातली जात आहे.

Babanrao Pachpute vs. Rajendra Nagawade
बबनराव पाचपुते म्हणाले, राजेंद्र नागवडे यांना पैशाची गुर्मी...

दरम्यान प्रचाराला थोडाच अवधी असल्याने जाहीर प्रचारापेक्षा होम टू होम प्रचाराचा जुना फंडा कार्यकर्ते वापरत असले तरी आता सोशल मीडियाच्या व्हायरल दुनियेची तरुणांना भुरळ पडली आहे. दोन्ही गटांचे कार्यकर्ते या मोबाईल प्रचाराचा खुबीने वापर करीत असले तरी कमरेखालचे होणारे वार निवडणुकीची शांतता भंग करणारे ठरु नयेत, असी भीती व्यक्त होत आहे. सोशल मीडियात ठराविक नेत्यांनाच लक्ष्य केले जात असून कारखान्यातील ज्येष्ठ मतदारांचीही त्यामुळे चांगलीच करमणूक होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in