मदनराव मोहितेंची सर्व मते सहकारमंत्र्यांना; आगामी निवडणूका एकत्र लढण्याचे सुतोवाच

मदनराव मोहिते Madanrao Mohite म्हणाले, मी राजकारणातुन निवृत्ती घेतली आहे. मात्र, केवळ सहकारमंत्री बाळासाहेब पाटील Balasaheb patil, राजेश पाटील- वाठारकर Rajesh patil watharkar यांच्या मंडळी निवडणुकीत उभ्या आहेत, म्हणुन प्रचार सभेत आलो आहे.
Madanrao Mohite, Balasaheb Patil
Madanrao Mohite, Balasaheb Patilsarkarnama

कऱ्हाड : सहकार टिकवायचा असेल तर चांगली माणसं सहकारात असली पाहिजेत. काहीजण म्हणतात माझा पारंपारिक मतदारसंघ आहे. असा पारंपारिक मतदारसंघ वगैरे काही नसतो. सहकारमंत्री बाळासाहेब पाटलांच्या रुपाने सहकारातील जाणते नेतृत्व जिल्हा बॅंकेत जात आहे. त्यामुळे बॅंक चांगली चालेल. त्यामुळे माझी सर्व मते मी सहकारमंत्र्यांना देईन. यापुढच्या सर्व निवडणूका आपण एकत्र मिळुन लढुया. एकत्र लढलो तर कऱ्हाड बाजार समिती आपण ताब्यात घेऊ, असा विश्वास ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना दिला.

मदनराव मोहिते म्हणाले, मी राजकारणातुन निवृत्ती घेतली आहे. मात्र, केवळ सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, राजेश पाटील- वाठारकर यांच्या मंडळी निवडणुकीत उभ्या आहेत, म्हणुन प्रचार सभेत आलो आहे. जिल्हा बॅंक आप्पासाहेब भोसले यांनी खऱ्या अर्थाने वाढवली. बॅँकेला शिस्त लावली. सहकार टिकवायचा असेल तर चांगली माणसं त्यात असली पाहिजेत. काहीजण म्हणताहेत माझा पारंपारीक मतदार संघ आहे. असे पारंपारिक मतदार संघ वगैरे काही नसतो. बाळासाहेबांच्या रुपाने सहकारातील जाणते नेतृत्व जिल्हा बॅंकेत जात आहे. त्यामुळे बॅंक चांगली चालेल. त्यामुळे माझी जी मते आहेत, ती मी सहकारमंत्र्यांना देणार आहे.

Madanrao Mohite, Balasaheb Patil
जिल्हा बँकेत डावलूनही सुनील माने म्हणतात, मी चुकीची भूमिका घेणार नाही...

यापुढच्या सर्व निवडणुका सहकारमंत्री पाटील आपण एकत्र मिळुन लढुया. एकत्र लढलो तर कऱ्हाड बाजार समिती आपण ताब्यात घेवु, असे त्यांनी आवाहन केले. कृष्णा कारखान्याला आर्थिक सहाय्य करु नये म्हणुन बॅंकेच्या दोन दिग्गज नेत्यांनी मोठे प्रयत्न केले होते. त्यावेळी आप्पासाहेब भोसले यांनी कारखान्याला कर्ज न दिल्यास बॅँक बंद करायला लागेल असे संबंधितांना सुनावले होते. साखर काऱखान्यांवर जिल्हा बॅंक चांगली चालली आहे. बॅंकेची वसुली करुन देण्याचे काम साखर कारखाने करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com