देशातील हुकूमशाही विरुद्ध लढण्यासाठी एक व्हा!

मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांची एकसष्ठी साजरी झाली.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama

सोलापूर : अक्कलकोट (Solapur) तालुक्याचे खरे जननायक हे माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे (Siddharam Mhetre) हेच आहेत. विकासाच्या जोरावरच त्यांनी जनतेचे प्रेम संपादित केले, असे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले.

Chhagan Bhujbal
भाजप नगरसेविकेच्या पतीला मारहाण करीत कपडे फाडले!

अक्कलकोट येथे माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांचा एकसष्ठी कार्यक्रम पार पडला त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, आज ज्यांचा एकसष्ठी कार्यक्रम आपण साजरा करत आहोत ते सिद्धराम म्हेत्रे यांची विशेष अशी ओळख करुन देण्याची गरज नाही असे मला वाटते कारण फक्त सिद्धराम म्हेत्रेच नाही तर त्यांच्या पुर्ण परिवाराने आयुष्यभर आपली सेवा केली आहे. सिध्दराम म्हेत्रे यांना समाजकारणाचा, राजकारणाचा वसा हा त्यांच्या वडीलांकडुनच मिळाला. राजकारणात पदार्पण करताच विविध विकास कामाच्या जोरावर त्यांनी तालुक्याचे लक्ष वेधून घेतले. विकासाच्या जोरावर जनतेने मोठ्या प्रेमाने त्यांना चार वेळा आमदारपद बहाल केले.

Chhagan Bhujbal
शरद पवारांच्या घरावरील हल्ला संघानेच घडवला?

ते पुढे म्हणाले, त्यांच्या कार्याचा आलेख पाहीला तर तो चढता दिसतो... श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक खजिनदार, पंचायत समितीचे सभापती, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, तालुक्याचे आमदार, ग्रामविकास राज्यमंत्री, गृहराज्यमंत्री, कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्षपद भुषविणारे अक्कलकोट तालुक्याचे जननायक म्हणून सिद्धाराम म्हेत्रे यांची ओळख आहे.

ते पुढे म्हणाले की म्हेत्रे यांच्या आजवरच्या कार्यकाळात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी तालुक्याच्या ठिकाणी वसतिगृहाची स्थापना,पंचायत समितीची नुतन इमारत, होतकरू विद्यार्थ्यांसाठी तालुक्याच्या ठिकाणी आणलेले आयटीआय कॉलेज, सर्वसामान्यांसाठी म्हाडा योजनेतील घरांची निर्मीती, ऊसाचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी तालुक्यात स्व. भगवान भाऊ शिंदेच्या सहकार्याने मातोश्री, गोकुळ व गोकुळ माऊली शुगर्सची केलेली स्थापना, मतदारसंघातील जनतेला आधार देण्यासाठी बंधू शंकर म्हेत्रे यांच्या सहकार्याने दुधनीतील सामुदायिक विवाह सोहळ्याची चळवळ, दुधनीच्या मार्केट यार्डची स्थापना, तालुक्याच्या विकासासाठी लांब पल्ल्याच्या रेल्वेंना थांबा , अक्कलकोट शहराच्या सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी अनेक पाणीपुरवठा योजना, अक्कलकोट- वागदरी बहुप्रतिक्षीत रस्ता, सोलापूर-गुलबर्गा मार्गाच्या पूर्णत्वासाठी केलेले प्रयत्न, अक्कलकोट बसस्थानकासाठी महाविकास आघाडीकडून मिळविलेले सहकार्य, अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकासासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा अशा अनेक पैलुंमूळे अक्कलकोटच्या सामाजिक राजकीय पटलावर सिद्धाराम म्हेत्रे यांचे नाव कायम राहणार आहे.

यावेळी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, आमदार संजय शिंदे, आमदार एम वाय पाटील, दिपकराव साळुंखे पाटील, डॉ. धवलसिंग मोहिते पाटील, बापू भुजबळ, अंबादास गारूडकर, आबा खारे, शंकर म्हेत्रे, मलिकार्जुन पाटील उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in