साताऱ्यातील शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या पाठीशी....

सर्व घडामोडी सुरू असताना सातारा Satara जिल्ह्यातील शिवसेनेचे Shivsena प्रमुख नेते मुंबईला Mumbai रवाना झाले आहेत.
shivsena Andolan
shivsena Andolansarkarnama

सातारा : मंत्री एकनाथ शिंदेंनी १७ आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारल्याने महाविकास आघाडीत शिवसेनेची अडचण झाली आहे. शिवसेनेत दोन गट पडले आहेत. गृहराज्यमंत्र्यांसह एक आमदार श्री. शिंदेंसोबत असल्याची चर्चा आहे. यावरून साताऱ्यातील शिवसैनिक संतप्त झाले असून त्यांनी पोवईनाक्यावर एकत्र येत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठींबा दर्शविला.

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याची व्ह्युव रचना भाजपने आखली आहे. त्यानुसार शिवसेनेचे नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १७ आमदारांनी बंड पुकारत सुरतला रवाना झाले आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शिवसेनेच्या आमदार व प्रमुख नेत्यांची तातडीची बैठक घेऊन एकनाथ शिंदे यांना गट नेते पदावरून दूर केले आहे.

shivsena Andolan
Video: शिवसेना आमदार नॉट रिचेबल मात्र खासदार शेतात...

या सर्व घडामोडी सुरू असताना सातारा जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रमुख नेते मुंबईला रवाना झाले आहेत. तर उर्वरित शिवसैनिकांनी सायंकाळी पोवईनाका येथे एकत्र येत रस्त्यावर बसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठींबा दर्शविला. शिवसेना जिंदाबाद, जय भवानी..जय शिवाजी., उद्धव साहब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है.., आवाज कुणाचा...शिवसेनेचा, अशी घोषणाबाजी केली.

shivsena Andolan
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील; यंदाची आषाढीची पुजाही तेच करतील...

यावेळी भुमिका मांडताना युवा सेनेचे सातारा शहर प्रमुख सचिन मोहिते म्हणाले, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला एकच शिकवण दिली आहे. २० टक्के राजकारण ८० टक्के समाजकारण असून आम्ही तीन गोष्टी नेहमी पाळतो. यामध्ये शिवसेना ही चार अक्षरे, आमचे चिन्ह धनुष्यबाण व तिसरी गोष्ट पक्षप्रमुखांचे आदेश तंतोतंत पाळणे.

shivsena Andolan
ठाकरे सरकार पडण्याची फक्त औपचारिकता बाकी : फडणवीसांच्या निकटवर्तीय आमदाराचे सूचक विधान

सातारा जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक व सर्व पदाधिकारी या कठीण प्रसंगामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठशी ठामपणे उभे आहेत. कोणाच्याही मनात व्दिधा अवस्था नाही. आम्हाला पक्ष प्रमुख देतील तो आदेश आम्ही तंतोतंत पाळू. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

shivsena Andolan
सातारा पालिका : महिला उमेदवार निवडताना दोन्ही आघाड्यांचा कस लागणार...

देसाईंच्या निवास्थानी पोलिस बंदोबस्त...

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या पोवईनाका येथील 'कोयना दौलत' या निवासस्थानी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. श्री. देसाई हे सुद्धा एकनाथ शिंदेंसोबत असल्याने शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जाऊ लागू नये, म्हणून पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com