एक रुपयांचा कढीपत्ता, मुन्ना झाले बेपत्ता! महाडिकांच्या विरोधात महिला उतरल्या मैदानात

महाडिक यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यांच्या विरोधात महिला मैदानात उतरल्या आहेत.
Chandrakant Patil and Dhananjay Mahadik
Chandrakant Patil and Dhananjay MahadikSarkarnama

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) आमनेसामने आले आहेत. या पोटनिवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. यातच भाजपचे नेते धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यांनी महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने वातावरण तापले आहे. त्यांच्या विरोधात आज सर्वपक्षीय महिलांनी ताराराणी चौकात जोरदार आंदोलन केले. यामुळे पोटनिवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत.

धनंजय महाडिक यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात त्यांनी महिलांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या वक्तव्याचा निषेध म्हणून काळे ड्रेस आणि काळी साडी परिधान करून महिलांनी आंदोलन केले. ताराराणी चौकात हे आंदोलन करण्यात आले. एक रुपयांचा कढीपत्ता, मुन्ना झाले बेपत्ता, अशी घोषणा देऊन महिलांना चौक दणाणून सोडला. कोल्हापूर भाजपचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, धिक्कार असो, धिक्कार असो, महिलांचा अपमान करणाऱ्या मुन्नांचा धिक्कार असो, घोषणा महिलांनी दिल्या. या वेळी काँग्रेसच्या

Chandrakant Patil and Dhananjay Mahadik
महाडिकांच्या वादग्रस्त वक्तव्यानं कोल्हापूरचं राजकारण तापलं!

महाडिक काय म्हणाले?

काँग्रसचे लोक येतील आणि तुम्हाला सांगतील आम्ही एक महिला उभी केली आहे. ती बिचारी आहे. तुम्ही सगळ्या महिला आहात तर तिला मतदान करा. मला सांगा तुमचा पती एखादं प्लंबिंग काम करत असेल तुम्हाला ते जमणार आहे का? तुमचा पती इलेक्ट्रिशियन असेल तुम्हाला ते काम जमणार आहे का ? ज्याचं काम त्यानं करायचं असतं, असे वक्तव्य महाडिक यांनी केले आहे.

Chandrakant Patil and Dhananjay Mahadik
पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीवर रामदेवबाबांचा पारा चढला अन् समोरच्याचे आई-बाप काढले!

काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या मृत्यूमुळे ही जागा रिक्त झाली आहे. येथून त्यांच्या पत्नी जयश्री जाधव (Jayashree Jadhav) मैदानात उतरल्या आहेत. जाधव या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात भाजपने सत्यजित कदम (Satyajeet Kadam) यांना मैदानात उतरवले आहे. कोल्हापूर उत्तरच्या मैदानात एकूण 15 उमेदवार आहेत. पोटनिवडणुकीचे मतदान 12 एप्रिलला होणार असून, निकाल 16 एप्रिलला लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com