कराड दक्षिणेत पृथ्वीराज चव्हाणांसाठी धोक्याची घंटा...

सहकारमंत्र्यांनीCooperative Minister भोसले गटाबरोबर असलेले माजी आमदार आनंदराव पाटीलAnandrao Patil , जेष्ठ नेते मदनराव मोहिते Madanrao Mohite, जेष्ठ नेते जयसिंगराव पाटील-उंडाळकर Jaysingrao Patil, काल्याचे भिमरावदादा पाटील Bhimrao Patil, दयानंद पाटील dayanand Patil, जगदीश जगताप Jagdish Jagtap यांच्यासह अन्य नेत्यांशीही थेट संपर्क साधुन त्यांची मोट बांधली.
कराड दक्षिणेत पृथ्वीराज चव्हाणांसाठी धोक्याची घंटा...
Balasaheb Patil, Prithviraj Chavansarkarnama

कऱ्हाड : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील हे डॉ. सुरेश भोसले, अतुल भोसले गटाच्या मदतीने विजयी झाले. त्यामुळे भोसले गट या निवडणुकीत किंगमेकर ठरला आहे. जिल्हा बॅंकेमुळे बदलणाऱ्या राजकीय समीकरणातून सहकारमंत्र्यांच्या साथीने कऱ्हाड दक्षिणेत भोसले गटाची खुंटी बळकट होत आहे. ती भविष्यात मतदारसंघावर अनेक वर्षे वर्चस्व असणाऱ्या काँग्रेससाठी पर्यायाने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांना धोक्याची घंटा ठरणार आहे. येणाऱ्या निवडणुकांतून त्याची झलक पहायला मिळणार आहे.

सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत कऱ्हाड सोसायटी गटात सहकार मंत्री पाटील हे स्वतः निवडणुक रिंगणात होते. त्याच्या विरोधात अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी मतदारांचा कौल आजमावला. ती लढत सहकारमंत्र्यांसाठी मोठी प्रतिष्ठेची बनली होती. त्यासाठी वर्षभरापासूनच सहकारमंत्र्यानी मतदारांचा अभ्यास सुरु केला होता. कऱ्हाड दक्षिणमध्ये मतदार जास्त असल्याने सहकारमंत्र्यांनी दक्षिणवर लक्ष केंद्रीत केले. त्यासाठी त्यांनी त्यांचे बंधु जयंत पाटील आणि जवळचे पाहुणे कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप यांच्या माध्यमातुन भोसले गट आपल्याबरोबर घेण्यासाठी फिल्डींग लावली.

Balasaheb Patil, Prithviraj Chavan
सातारा जिल्हा बँक निवडणूकीत शशिकांत शिंदेंना पराभवाचा धक्का

तत्पुर्वी कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीतही काही उलाढाली झाल्या. त्यानंतर अनेक चर्चा, बैठका, भविष्यातील निवडणुकांतील मदतीसंदर्भात खल होवुन जिल्हा बॅंकेसाठी भोसले गटाबरोबर वाटचाल करण्याचे ठरवण्यात आले. भोसले गट आपल्याबरोबर राहिल याचा अंदाज आल्यावर सहकारमंत्र्यांनी भोसले गटाबरोबर असलेले माजी आमदार आनंदराव पाटील, जेष्ठ नेते मदनराव मोहिते, जेष्ठ नेते जयसिंगराव पाटील-उंडाळकर, काल्याचे भिमरावदादा पाटील, दयानंद पाटील, जगदीश जगताप यांच्यासह अन्य नेत्यांशीही थेट संपर्क साधुन त्यांची मोट बांधली.

Balasaheb Patil, Prithviraj Chavan
माझ्या पराभवासाठी शिवेंद्रसिंहराजे जबाबदार ; हे त्यांचेच षडयंत्र आहे : शशिकांत शिंदे

त्यानंतर निकालाच्या आदल्या दिवशीही सहकारमंत्री आणि भोसले गटाच्या थेट ७८ मतदारांच्या उपस्थितीत भोसलेंबरोबर बैठक झाली. तर उंडाळकरांना एकाकी झुंज द्यावी लागली. त्यांच्याबरोबर काँग्रेसचा एकही नेता प्रचारासाठी आला नाही. त्यांनी स्वतःच्या हिंमतीवर निवडणुक लढवली. त्यात सहकरमंत्र्यांना उंडाळकरांपेक्षा आठ मते जास्त मिळाल्याने त्यांचा विजय झाला. या लढतीत सहकारमंत्र्यांना भोसले गटाने मोठी मदत करुन तेच किंगमेकर ठरले आहेत.

Balasaheb Patil, Prithviraj Chavan
"शंभूराज देसाई - उदयसिंह पाटील' साडूंच्या पदरी अपयश! 

कऱ्हाड दक्षिणमधील मतांच्या जोरावर सहकारमत्र्यांना विजयी मजल मारता आली. दरम्यान, या निकालाने भोसले गटाची ताकद वाढली आहे. सहकारमंत्र्यांची साथ मिळुन कऱ्हाड दक्षिणधील भोसले गटाची खुंटी बळकट होणार आहे. ती भविष्यात मतदार संघावर अनेक वर्षे वर्चस्व असणाऱ्या काँग्रेससाठी धोक्याची घंटा ठरु शकते. हे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांच्या निवडणुकांतुन दिसुन येईल.

Balasaheb Patil, Prithviraj Chavan
सातारा तालुक्यातील सर्व मते राष्ट्रवादीच्या सहकार पॅनेललाच : शिवेंद्रसिंहराजे

या निवडणुकीत कऱ्हाड उत्तरमध्ये मतदान कमी होते. त्या तुलनेत कऱ्हाड दक्षिणमध्ये मतदानाची आकडेवारी जास्त आहे. त्यामुळे दक्षिणमधील मतदान आपल्याला मिळावे यासाठी सहकारमंत्री पाटील यांनी कऱ्हाड दक्षिणमधील नेत्यांवर विश्वास ठेवुन त्यांना बरोबर घेतले. त्या नेत्यांनीही प्रामाणिक काम करुन चुरशीच्या लढतीत सहकारमंत्र्याना साथ देत त्यांना विजयी केले.

Related Stories

No stories found.