Varkari on Sushma Andhare: अंधारेंच्या बुद्धीला प्रकाशाचे चटके... अक्षयमहाराज यांची टीका

Sushma Andhare वारकरी संप्रदाय युवा मंच राज्यभर सुषमा अंधारे यांच्या अटकेसाठी महाराष्ट्रभर तक्रार नोंदवित आहेत.
Sushma Andhare, AkshayMaharaj Bhosale
Sushma Andhare, AkshayMaharaj Bhosalesarkarnama

बिजवडी : अंधारातून थेट प्रकाशात आल्यामुळे बुद्धीला चटके बसून असे बेताल वक्तव्य केले जात आहे का, असा सवाल वारकरी संप्रदाय(Varkari Sampraday) युवा मंचच्या वतीने अध्यक्ष अक्षयमहाराज भोसले यांनी केला. आपल्या या बेताल वक्तव्याबाबत अंधारे यांनी श्रीक्षेत्र आळे, पैठण व पंढरपूर येथे प्रवास करत सकल संत व संपूर्ण वारकरी संप्रदायाची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार केवळ तोंडाने बोलून चालत नाहीत. तर ते आचरणात सुद्धा आणावे लागतात. भारतरत्न डॉ.बाबासाहेबांनी जी चळवळ केली, त्यात मूकनायक व बहिष्कृत भारत या वृत्तपत्रांचा मोठा वाटा आहे. या वृत्तपत्रांचे ब्रीदवाक्य म्हणून मूकनायकवर तुकोबारायांच्या अभंगाच्या ओळी तर बहिष्कृत भारत वर माऊलींच्या ओव्या छापलेल्या असत. संतांच्या विचारात संविधानाचा गाभा आहे, आणि त्या संतांचा आपण अवमान करता याबद्दल जरा ही यांना खेद वाटतं नाही.

महाराष्ट्राच्या जडणघडणीत सकल संतांचे अभूतपूर्व योगदान आहे. राजकारण करत असाल तर तिकडे काय घासरायचं ते घसरा मात्र, संत चरित्र व वाडःमयाच्या बाबतीत केलेला अवमान आम्ही कदापी सहन करणार नाही. ज्या पक्षात सदर ताई असतील त्या पक्षाला आजीवन वारकरी संप्रदाय मतदान करणार नाही. माऊलींनी केवळ एक रेडाच नाही तर आमच्या सारखे हजारो रेडे बोलावले यात आम्हाला अभिमान आहे.

Sushma Andhare, AkshayMaharaj Bhosale
Maharashtra Politics : तेव्हा फक्त एकनाथ शिंदेच होते, ज्यांनी माझ्यावर विश्‍वास ठेवला...

या महाराष्ट्रात संतांनी दिलेल्या शिकवणीनुसार कार्यरत असणारे हजारो कीर्तनकार रोज प्रबोधनाच कार्य करत आहेत हे विसरुन जमणार नाही व हे आम्हाला आमच्या संतानी दिलेलं बाळकडू आहे. माता माउलींचा आदर करणे आम्हाला याच संतानी शिकवले. त्यामुळे आम्ही शांततेच्या मार्गाने निषेध व्यक्त करत आहोत.

Sushma Andhare, AkshayMaharaj Bhosale
Gurav Samaj Convention : गुरव समाजासाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा : संत काशिबा विकास योजनेची केली सुरुवात

वारकरी संप्रदाय युवा मंच राज्यभर सुषमा अंधारे यांच्या अटकेसाठी महाराष्ट्रभर तक्रार नोंदवित आहेत. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच उद्धव ठाकरे यांनी अशा प्रवृत्तीना वेळीच आवर घालात जनप्रक्षोभाला सामोरे जाणे टाळावे व योग्य ती कार्यवाही करावी. आपल्या या बेताल वक्तव्याबाबत अंधारे यांनी श्रीक्षेत्र आळे, पैठण व पंढरपूर येथे प्रवास करत सकल संत व संपूर्ण वारकरी संप्रदायाची माफी मागावी, असे अक्षयमहाराज यांनी म्हटले आहे.

Sushma Andhare, AkshayMaharaj Bhosale
अंधारे म्हणाल्या, शाई कुठे लावावी हे कळले पाहिजे, चंद्रकांतदादांबद्दल घडलेला प्रकार चुकीचा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com