पडळकरांनी बळजबरीने पद दिल्याचे सांगत तो नेता आठ दिवसांतच राष्ट्रवादीत!

आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या निमित्ताने मोहोळ तालुक्यात बदलती समीकरणे
पडळकरांनी बळजबरीने पद दिल्याचे सांगत तो नेता आठ दिवसांतच राष्ट्रवादीत!
Rajan Patil and Akshay Khatalsarkarnama

सोलापूर : राजकारणात कधी काय घडेल ते सांगता येत नाही. पाच जानेवारी रोजी भाजपमध्ये प्रवेश करून तेथे पद घेतल्याची चर्चा असलेला नेता आठवड्यात पुन्हा राष्ट्रवादीत (NCP) आल्याचा प्रकार सोलापूरमध्ये (Solapur Politics) घडला. या नेत्याने भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी मला बळजबरीने पक्षाचे पद दिल्याचा दावा केला. या नेत्याने पुन्हा आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. अक्षय खताळ असे या नेत्याचे नाव आहे.

Rajan Patil and Akshay Khatal
मुंबै बॅंक : चिठ्ठी उचलली गेली आणि उपाध्यक्षपद तरी भाजपला मिळाले

त्यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशाच्या वेळी यावेळी राजन पाटील यांच्यासह आमदार यशवंत माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, माजी महापौर महेश कोठे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील, पंचायत समिती सदस्य अजिंक्‍यराणा पाटील, तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, मोहोळ बाजार समितीचे उपसभापती दत्ता पवार आदी नेतेमंडळी उपस्थित होते.

Gopichand Padalkar and Khatal
Gopichand Padalkar and KhatalFacebook

राजन पाटील यांनी खताळ यांच्याबद्दल बोलताना त्यांचे कौतुकच केले. मोहोळ तालुक्‍यातील खताळ कुटुंबियांनी तीन पिढ्यांपासून कॉंग्रेस-राष्ट्रवादीची विचारधारा जपली आहे. जिल्हा परिषद सदस्य स्व. तानाजी खताळ हे आमचे सहकारीच होते. मध्यंतरीच्या काळात ते इतरत्र असले तरी नेहमी आमच्या संपर्कात होते. त्यांचे सुपुत्र अक्षय खताळ यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे मोहोळ तालुक्‍यातील राष्ट्रवादीची ताकद वाढली असल्याचाहा दावा राजन पाटील यांनी केला.

Rajan Patil and Akshay Khatal
भाजपमधून बाहेर पडताच नेत्याची भविष्यवाणी :राधाकृष्ण विखे होणार नवे प्रदेशाध्यक्ष

या वेळी अक्षय खताळ म्हणाले, राष्ट्रवादीत प्रवेश करायचा निश्‍चित होते. काही पत्रकारांनी आमदार गोपीचंद पडळकर यांची भेट मला घालून दिली. मी त्यांना भेटलो. भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्याकडे मला काही जण घेऊन गेले, तिथे मला बळजबरीने पक्षाचे पद दिले व खोडसाळपणे ते फोटो व्हायरल केले. राजन पाटील यांच्या आशीर्वादासाठीच आपण राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार माने, जिल्हाध्यक्ष साठे, माजी उपमहापौर कोल्हे यांनी मनोगत व्यक्‍त केले.

अक्षय खताळ यांची भाजपा ओबीसी युवा मोर्चा सोलापूर जिल्हाध्यक्षपदी निवड झाली होती. गोपीचंद पडळकर साहेब यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही करण्यात आला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in