Akole Nilwande Dam : 8 कोटींचा प्रकल्प, पूर्ण व्हायला लागले तब्बल 5 हजार कोटी; 53 वर्षांनी उद्धाटन झालेल्या निळवंडे धरणाचा इतिहास काय?

Akole Nilwande Dam News : तब्बल 53 वर्षांनंतर उद्घाटन तर 5 हजार कोटींचा खर्च..
Akole Nilwande Dam :
Akole Nilwande Dam :Sarkarnama

Ahmednagar News : निळवंडे प्रकल्पाचे काम अखेरीस पूर्ण दिले आहे. या प्रकल्प पुर्ण होण्यासाठी तब्बल 53 वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. निळवंडे प्रकल्पाच्या कालव्याची काम ही पूर्ण झाले आहे. यामुळे अवर्षण ग्रस्त भागाला हा प्रकल्प वरदान ठरणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज या प्रकल्पाचे उद्धाटन झाले.

निळवंडे धरणाच्या प्रकल्पामुळे अहमदनगर जिल्ह्यातील एकूण सहा दुष्काळी भागांची पाण्याच्या समस्यातून सुटका होण्यास मदत होईल. नाशिक जिल्ह्यातील सिन्नौर आणि अहमदनगर भागातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाछी तब्बल 53 वर्षे लागली.

Akole Nilwande Dam :
Rajmata Ahilya Devi Holkar Birth Anniversary : अहिल्यादेवींच्या विचारांचा जागर देशाच्या राजधानीत घुमणार !

1970 मध्ये प्रकल्पाला मंजुरी :

अहमदनगर जिल्हात म्हालादेवी गावात हा प्रकल्प उभारण्यात येणार असे ठरवण्यात आले. 1970 साली या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. मंजुरी दिला गेला, त्यावेळी या प्रकल्पाची साधरण खर्च 8 कोटी रूपयांचा होता. या धरणाच्या पाणी साठवून ठेवण्याची क्षमता 11टीएमसी एवढी निर्धारित करण्यात आली होती. परंतु तब्बल 9 वर्षे हा प्रकल्पाची फाईल उघडण्यातच आली नाही.

1995 साली हा प्रकल्प म्हाळादेवीगावातून निलवंडे येथे हलवण्यात आला. विशेष म्हणजे, या धरणाची जलधारण क्षमता ही कमी करण्यात आली. 11 टीएमसीवरून 8.52 टीएमसीपर्यंत जसधारण क्षमता कमी झाली, मात्र प्रकल्पाच्या बजेट मात्र वाढले होते.

Akole Nilwande Dam :
Ahilyadevi Holkar Jayanti : अहिल्यादेवी होळकर जयंतीवरुन रोहित पवार-राम शिंदे आमने सामने ; पवारांनी मध्यरात्रीच..

प्रकल्पाला विलंब आणि बजेटमध्ये सातत्याने वाढ :

निळवंडे धरण प्रकल्पाचे काम सुरू झाले नाही. प्रकल्पाला सातत्याने विलंब होत राहिला. यामुळे प्रकल्प निर्मितीचा खर्च होत राहिला. प्रकल्पाच्या बजटचे आकडे वाढतच राहिले. अहमदनगर जिल्ह्यात अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी आणि कोपरगावसह या तालुक्यांसह, नाशिक जिल्ह्यातील तब्बल 182 गावांना या प्रकल्पामुळे फायदा होणार आहे. तथापि निळवंडे धरण प्रकल्पाचे बांधकाम 2014 साली पूर्ण झाले. मात्र त्यांनतरही कालव्याचे काम कित्येक वर्षे पूर्ण झालेलेच नव्हते.

Akole Nilwande Dam :
Vilasrao Deshmukh Birth Anniversary : सरपंच ते मुख्यमंत्री...! 'असा' होता विलासराव देशमुखांचा राजकीय प्रवास

१९७० ला सुरूवातीला या प्रकल्पाचा खर्च 8 कोटी रूपयांपर्यंत येणार होता. तर तब्बल ५३ वर्षे विलंब होता होता, या प्रकल्पाचा खर्च तब्बल 5177 कोटी रुपयांपर्यंत पोहचला. ज्या प्रकल्पाला आठ कोटींचा म्हणजे होणार होते. प्रचंड विलंब झाल्यामुळे या प्रकल्पाला 5179 कोटी रूपयांचा भर पडली. हा संपूर्ण प्रकल्प धरण आणि कालव्याचा जाळ्यासह 182 किमी परिसरात हा प्रकल्प विस्तीर्ण पसरलेला आहे.

Akole Nilwande Dam :
लाडक्या लतादीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी दिग्गजांसह लाखो चाहत्यांची हजेरी..

१२५ गावांचा पाण्याचा प्रश्न मिटणार :

दरम्यान, हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी तब्बल 53 वर्षांचा कालावधी लागला, असे असले तरी आता या धरणामुळे अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. तब्बल 68000 हेक्टर जमिनीचा सिंचन प्रश्न मिटणार आहे.

नाशिक ते अहमदनगर या दोन जिल्ह्यामधील 125 गावांना पाणी उपलब्ध होणार आहे. यापुढे आता या धरणीातून पाणी वितरीत करण्यासाठी पाईपचे जाळे तयार करण्यात येणार आहे. यातून या गावात पाणी वितरीत होईल, पाईपचे जाळे तयार होण्यासाठी आणखी तीन वर्षांपर्यंतचा कालावधी लागू शकतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com