Satara : अजितदादांनी वैचारीक मोठेपणा दाखवावा...शहाजीबापू

Shahajibapu Patil कऱ्हाड (जि.सातारा) येथील एका खासगी कार्यक्रमानिमित्त आमदार शहाजीबापू पाटील आले होते.
Ajit Pawar, Shahajibapu Patil
Ajit Pawar, Shahajibapu Patilsarkarnama

Karad News : स्वराज्यरक्षक हा अजित पवार Ajit Pawar यांचा शब्द बरोबर आहे. परंतू, छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य विस्तारक आणि कडवे हिंदु धर्मवीर होते. अजितदादांनी स्वराज्यरक्षक शब्दाबरोबर धर्मवीर संभाजी महाराज असे म्हटले तर, ते महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील जनतेला ते आवडेल. त्यामुळे अजितदादांनी तेवढा वैचारीक मोठेपणा दाखवावा, असे मत बाळासाहेबांची शिवसेना Shivsena गटाचे आमदार शहाजीबापू पाटील Shahajibapu Patil यांनी येथे व्यक्त केले.

कऱ्हाड (जि.सातारा) येथील एका खासगी कार्यक्रमानिमित्त आमदार शहाजीबापू पाटील आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर व स्वराज्यरक्षक म्हणण्यावरून सध्या राज्यात वाद निर्माण झाला आहे. यावरून आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्वराज्यरक्षक हेच बरोबर आहे. धर्मवीर नव्हे तर स्वराज्यरक्षक या शब्दावर ठाम असल्याचे म्हटले होते.

त्यावरून शहाजीबापू यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. श्री. पाटील म्हणाले, स्वराज्यरक्षक हा अजित पवार यांचा शब्द बरोबर आहे. परंतू, छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य विस्तारक आणि कडवे हिंदु धर्मवीर होते. अजितदादांनी स्वराज्य रक्षक शब्दाबरोबर धर्मवीर संभाजी महाराज असे म्हटले तर ते महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील जनतेला ते आवडेल. अजितदादांनी तेवढा वैचारीक मोठेपणा दाखवावा.

Ajit Pawar, Shahajibapu Patil
Satara : 'रयत' करणार 'आयबीएम'शी करार; विद्यार्थ्यांना नोकरीची हमी : पवार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com