Kolhapur Politics : शिंदे गटातील खासदारांच्या कामात अजितदादांच्या मंत्र्यांचा खोडा ?

Sanjay Mandlik Vs Hasan Mushrif : कोल्हापुरातील दोन 'राजकीय पैलवानांची' जवळ आलेली मने पुन्हा दुभंगली ?
Kolhapur Politics : Hasan Mushrif : Sanjay Mandalik
Kolhapur Politics : Hasan Mushrif : Sanjay MandalikSarkarnama

Kolhapur News : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) समावेश झाल्यानंतर शिंदे गटातील मंत्री आणि आमदारांची अस्वस्थता वाढली होती. याची अनेक उदाहरणे वारंवार पाहायला मिळाली. आता कोल्हापूरमधील मोठे नेते व राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांच्या कामात खोडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे कोल्हापुरात अजितदादा गट आणि शिंदे गट या दोन्ही गटांत सुप्त संघर्ष सुरू असल्याची चर्चा आहे. (Latest Marathi News)

Kolhapur Politics : Hasan Mushrif : Sanjay Mandalik
Parbhani NCP News: परभणीत राष्ट्रवादीची घडी विस्कटली; पुढे आणखी धक्के बसणार...

याबाबत कोल्हापूर शिंदे गट जिल्हाध्यक्ष व मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजे खान जमादार यांनी आरोप केला आहे. या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यातील शिंदेंच्या शिवसेनेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये मोठी धुसफूस पाहायला मिळत आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये समन्वय असल्याचे सागण्यात येत असले तरी स्थानिक पातळीवर अनेकदा तिन्ही पक्षांतील नेते आमने-सामने आल्याची उदाहरणे दिसून येतात. आता कोल्हापूरमधील हा प्रकार पुढे आले आहे.

शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांच्या निधीतून मुरगुड परिसरात रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, हे काम सुरू असताना यामध्ये मंत्री मुश्रीफ यांनी व्यत्यय आणून, अडवणूक केल्याचा आरोप राजे खान जमादार यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर केला. मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन याबाबत आज संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जाब विचारला.

Kolhapur Politics : Hasan Mushrif : Sanjay Mandalik
BJP-JDS Alliance News : भाजप-जेडीएसमध्ये कुरबुरी वाढल्या; कर्नाटकातील जागावाटपावरून नाराजी !

या वेळी कार्यालयाच्या आवाराबाहेर प्रचंड वादावादी झाली. मंत्री हसन मुश्रीफ यांनी हे काम अडवले असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. राष्ट्रवादीला सत्तेत सोबत घेतल्यामुळे राजकीय अडचण झाली आहे, असा खळबळजनक आरोप राजे खान जमादार यांनी केला. संजय मंडलिक आणि मुश्रीफ यांची राजकीय पार्श्वभूमी पाहता, लोकसभेला जुळलेली मने पुन्हा एकदा या आरोपावरून दुभंगलेली पाहायला मिळत आहेत.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in