काटेवाडीला‌ पाणी नेण्याचा अजित पवारांचा डाव : राष्ट्रवादीच्या संजय पाटलांचा आरोप

लाकडी-निंबोडी ही योजना कोणत्याही परिस्थितीत आम्ही सुरू करू देणार नाही, प्रसंगी रक्त सांडू; पण आमचे हक्काचे पाणी जाऊ देणार नाही.
काटेवाडीला‌ पाणी नेण्याचा अजित पवारांचा डाव : राष्ट्रवादीच्या संजय पाटलांचा आरोप
Sanjay PatilSarkarnama

पंढरपूर : ‘‘उजनी धरणातून (Ujani Dam) इंदापूर (Indapur) आणि बारामती (Baramati) तालुक्याला पाणी नेण्याचा डाव आखला असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या योजनेत स्वतःच्या काटेवाडी गावाचाही समावेश केला आहे. त्यामुळे अजित पवार यांचा खरा चेहरा समोर आला आहे. लाकडी-निंबोडी ही योजना कोणत्याही परिस्थितीत आम्ही सुरू करू देणार नाही, प्रसंगी रक्त सांडू; पण आमचे हक्काचे पाणी जाऊ देणार नाही,’’ असा इशारा माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) नेते संजय पाटील घाटणेकर यांनी आज (ता. २९ मे) पंढरपुरात दिला. (Ajit Pawar's attempt to gave water to Katewadi : NCP's Sanjay Patil's allegation)

गेल्याच आठवड्यात आमदार प्रणिती शिंदे यांनी उजनीचे पाणी पळविले तर रान पेटवू, असा इशारा महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादीला दिला होता. तत्पूर्वी भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनीही उजनीच्या पाण्यावर दत्तात्रेय भरणे यांना टार्गेट केले होते. त्यामुळे संजय पाटील घाटणेकर यांच्या इशाऱ्यानंतर उजनीचा पाणीप्रश्न आणखी पेटण्याची शक्यता आहे.

Sanjay Patil
पाया पडायला आलेल्या कार्यकर्त्याला आमदार राजेंद्र राऊतांची भरस्टेजवर मारहाण

उजनी धरणातून सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकीय वजन वापरून इंदापूर आणि बारामती तालुक्यासाठी लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजना मंजूर केली आहे. या योजनेसाठी सुमारे ३४८ कोटी रूपयांची तरतूददेखील करण्यात आली आहे. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि विविध शेतकरी संघटनांनी या योजनेला विरोध सुरू केला आहे. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडूनही या योजनेला विरोध करत थेट उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सोलापूरचे पालकमंत्री भरणे यांना आव्हान देण्यात आले आहे.

Sanjay Patil
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात येऊन शाहू महाराजांची भेट घेणार!

बारामती तालुक्यातील काटेवाडी गावाला नीरा कालव्यातून शेतीसाठी बारमाही पाण्याची सोय आहे, त्यामुळे हा भाग बागायती आहे. तरीही बारामतीच्या तहसीलदारांनी काटेवाडी हे गाव अवर्षणप्रवण असल्याचा अहवाल दिला आहे, असे संजय पाटील घाटणेकर यांनी म्हटले आहे.

Sanjay Patil
अजित पवार म्हणाले,'आम्ही विसरत नाही, वेळ आली की प्रत्येकाची दखल घेतो'

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेचा गैरवापर करून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी पळवण्याचा डाव आखला आहे. पण, तो डाव आम्ही हाणून पाडू. उजनी धरणातून आमच्या हक्काचे एक थेंबही पाणी इंदापूर आणि बारामतीला जाऊ देणार नाही. योजनेच्या विरोधात आंदोलन करू, असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in