एकनाथ शिंदेंना अजित पवार म्हणाले, कधी आपल्याला एकत्र यावे लागेल सांगता येत नाही...

राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाच्या विषयावरून विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

Pawar Vs Shinde : महाराष्ट्राच्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यात दुसऱ्या दिवशी राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाच्या विषयावरून विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांवर आलेली नैसर्गिक आपत्ती व मंत्रीमंडळाच्या निर्णयावर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फिरकी घेतली.

Ajit Pawar
Maharashtra Assembly Live पालघरच्या जिल्ह्याच्या आरोग्य प्रश्नांवरून अजित पवार संतापले

अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री साहेब आपल्याला महाराष्ट्राचा दौराही महत्त्वाचा वाटला यात दुमत नाही. मात्र त्या दौऱ्यावर तुम्ही व तुमचे मंत्री जात असताना क्रेनने मोठे हार घालण्याचे काम सुरू होते. तिथे माणसे मरत आहेत. आत्महत्या करत आहेत. आणि तुम्ही काय करत आहात तर सध्याच्या राज्यातील आपत्ती संदर्भात तुम्ही आदेश काढायला हवा होता की, कोणी सत्कार स्वीकारू नका. थोडे शांतपणे घ्या, सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी मजबूतपणे उभे राहण्याचे काम करायचे असते. मात्र तुम्ही तसे केले नाही, असा आरोप त्यांनी केला.

Ajit Pawar
Ajit Pawar : अजित दादा म्हणाले सत्ताधाऱ्यांना, हे वागणं बरं नव्हं..!

ते पुढे म्हणाले की, आपण एकत्रित मंत्रीमंडळात असताना जी कामे मंजूर केली. त्याला स्थगिती देण्याचे काम बरं नव्हं, असे म्हणत त्यांनी हात जोडले. कधी कुणावर काय प्रसंग येईल सांगता येत नाही. सगळे दिवस सारखे नसतात. कधी आपल्याला एकत्र यावे लागेल सांगता येत नाही. त्यामुळे असे करू नका, अशी कोरपखळी ही त्यांनी मारली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in