'बांधकाम'च्या अधिकाऱ्यांना अजित पवारांनी झापडले...

आज Ajit Pawar कराड Karad, पाटण Patan तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांना कराड शासकिय विश्रामगृहात Karad Circuit House पुन्हा समस्यांचा problems सामना करावा लागला.
Ajit Pawar
Ajit Pawarsarkarnama

सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार आज कराड, पाटण तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. काल (रविवारी) रात्री ते शासकिय विश्रामगृहात दाखल झाले. त्यावेळी त्यांना विश्रामगृहातील व्हीआयपी सुटमध्ये अस्वच्छता दिली. त्यामुळे ते चांगलेच संतप्त झाले. त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना झापडले. पुन्हा अस्वच्छता दिसल्यास माझ्याशी गाठ आहे, असा दमही त्यांनी अधिकाऱ्यांना भरला.

उपमुख्यमंत्री अजित पवार ज्या ज्यावेळी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतात. त्यावेळी त्यांना शासकिय विश्रामगृहातील अस्वच्छतेचा सामना करावा लागला आहे. मागील आठवड्यात वाढे येथील कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार सातारा शासकिय विश्रामगृहात थांबले होते. त्यावेळी त्यांना येथील व्हिआयपी सुटमध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. त्यावरून त्यांनी येथील अधिकाऱ्यांनाही झापडले होते.

Ajit Pawar
Video: शेतकऱ्यांनो टोकाची भूमिका घेऊ नका; अजित पवार

काल रात्री ते कराड, पाटण तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांना कराड शासकिय विश्रामगृहात पुन्हा समस्यांचा सामना करावा लागला. तेथील अस्वच्छता पाहून अजित पवार जाम वैतागले. त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच झापडले. तसेच यापुढे विश्रामगृहात अस्वच्छता दिसल्यास माझ्याशी गाठ आहे, असा दमही अधिकाऱ्यांना भरला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com