अजित पवार म्हणाले, सरकार नोटा छापायची मशिन नाही...

महाराष्ट्राचे ( Maharashtra ) उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी वीज बिलाच्या वसुलीबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
अजित पवार
अजित पवारसरकारनामा

अहमदनगर : राज्यात महावितरण प्रशासनाकडून वीज बिलांची सक्तीने वसुली करण्यात येत आहे. यावरून भाजपचे नेते महाविकास आघाडीवर टीका करत आहेत. अशाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज बिलाच्या वसुलीबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. Ajit Pawar said, the government is not a machine for printing notes ...

जामखेड येथे विविध विकासा कामांचे भूमिपूजन अजित पवार व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी अजित पवार बोलत होते. या वेळी आमदार संग्राम जगताप, आमदार लहू कानडे, आमदार नीलेश लंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख आदी उपस्थित होते.

अजित पवार
अजित पवार म्हणाले; नो कॉमेन्टस् म्हणण्याचा आधिकार मला आहे की नाही

अजित पवार म्हणाले, राज्यात 10 कोटी लोकांना कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. तरीही गाफील राहू नका. विनामास्क फिरू नका. आपल्या दुर्लक्षामुळे कोरोनाची लाट आली तर त्याची किंमत राज्य व देशाला चुकवावी लागेल याचे भान ठेवा.

ते पुढे म्हणाले, कर्जत-जामखेड ही पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांची पुण्यभूमी आहे. या पूर्वी कर्जत-जामखेड मतदार संघातील लोकप्रतिनिधींनी आपापल्या परीने या दुष्काळी भागात कामे केली. जसे बोलतो तसे वागतो ही आमची काम करण्याची पद्धत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी मी येथील मतदारांना साथ देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार येथून तीन जिल्हा परिषद सदस्य निवडून दिले. त्यामुळे या भागाला जिल्हा परिषद अध्यक्षपदही दिले होते. रोहित पवारांना निवडून दिल्यापासून त्यांनीही विकास निधी आणून कामे सुरू केली आहेत, असे अजित पवार यांनी सांगितले.

अजित पवार
आमदार रोहित पवारांनी एकाच बाणात केले अनेक पक्षी घायाळ...

हे भाषण सुरू असतानाच एका श्रोत्याने वीज बिल वसुली बाबत बोला, अरोळी दिली. यावर अजित पवार म्हणाले, राज्यात 70 हजार कोटींची विजे बिले थकलेली आहेत. विजेचा अपव्यय वाढलेला आहे. वेळेवर वीज कोणी बंद करत नाही. थकबाकी रकमा भरत नाही. त्यामुळे राज्य सरकारला दगडी कोळसा घेण्यासाठी अडचणी येतात. मीही ऊर्जा खाते पाहिले आहे. मीही त्या खात्याचा मंत्री असतो तरी कठोर भूमिकाच घेतली असती.

ज्या भागात वीज बिल वसुली चांगली तेथे विद्युत उपकरणे विकत घेण्यासाठी जास्त खर्च येत नाही. कोल्हापूर जिल्ह्यात वीज बिल वसुलीत आग्रेसर आहेत. त्यामुळे तेथे विद्युत साहित्य देण्यात महावितरण व राज्य सरकार तयार असते. आपल्याकडे पिकाला पाणी द्याचे म्हणजे संपूर्ण शेताला पाणी दिले जाते. मोटारी तशाच चालू राहतात. शेताला पाणी द्यायचे म्हणजे पिकांच्या मुळांना पाणी देणे आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आर्थिक शिस्त लावून घेतली पाहिजे.

अजित पवार
रोहित पवारांसमोरच राष्ट्रवादीचे दोन गट भिडले; पवार तिसऱ्या गटासोबत गेले!

ते पुढे म्हणाले, गरजूंना राज्य सरकार निश्चित विविध योजनांतून मदत देत आहे. सरकार नोटा छापण्याचे मशिन नाही. मागील दोन वर्षांत कोरोना, पूर, वादळ, अतिवृष्टी अशी अनेक संकटे आली. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या संदर्भात आम्हा विमा कंपन्यांना नुकसान भरपाई देण्यास सांगितले आहे. बऱ्याच विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई देण्यास सुरवात केली आहे. मात्र रिलायन्सने अजूनही नुकसान भरपाई देण्यास सुरवात केलेली नाही. आपण स्वयंशिस्त पाळली पाहिजे. विजेचा गैरवापर करू नये. राज्य सरकारकडून शेततळी दिली जात आहेत. त्यातून पिकांच्या मुळांना पाणी देण्याचे काम करा, असे आवाहनही अजित पवार यांनी केले.

अजित पवार
आरोग्य विभागाच्या परिक्षेतील सावळ्या गोंधळावर रोहित पवार संतापले

पाचपुतेंना टोला

अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्याही साखर कारखान्याने दिला नाही एवढा 2800 रुपये प्रतीटन एफआरपी भाव अंबालिका साखर कारखाना देत आहे. करायचे असेल तर समाजाच्या भल्यासाठी काम करा. काही साखर कारखान्यांनी तर मागील दोन हंगामांचे एफआरपीचे पैसे शेतकऱ्यांना दिलेले नाहीत, असा टोलाही अजित पवारांनी नाव न घेतात भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com