Ajit Pawar Statement : अजितदादांनी केलं रोहित पवारांचं कौतुक; म्हणाले...

Rohit Pawar News : भाकरी फिरविण्याची सुरूवात ज्येष्ठ नेत्यांपासून होणार
Ajit Pawar, Rohit Pawar
Ajit Pawar, Rohit PawarSarkarnama

Ajit Pawar Praises Rohit Pawar : विरोधी पक्षनेते अजित पवार हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणाबद्दल ओळखले जातात. कुणाचीही भीड न बाळगता ते संबंधितांचा जाग्यावरच स्पष्ट बोलून विषय मिटवितात. तर चांगले काम करणारांच्या पाठीवर थाप देऊन कौतूक करण्यासही ते कंजुषी करत नाहीत. कोल्हापूर येथील कार्यकर्ता मेळाव्यात अजितदादांनी आमदार रोहित पवार यांचे कौतुक केले. रोहित यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला कठीण असलेला मतदारसंघ ताब्यात घेतल्याचेही अजित पवार यांनी यावेळी अवर्जुन सांगितले.

Ajit Pawar, Rohit Pawar
Ajit Pawar : अजित पवारांनी काढला सतेज पाटलांना चिमटा; म्हणाले "बंटीला आता बंटी झाले तरी..."

अजित पवारांनी रोहित (Rohit Pawar) यांना राजकारणात येण्यापूर्वीच्या झालेल्या घडोमोडींचा किस्सा उलगडला. त्यांनी सांगितले की, "एके दिवशी रोहित म्हणाला की मला राजकारणात यायचे आहे. त्यावेळी त्याला मी सांगितले की बारामतीत मी असल्याने जागा खाली नाही. पुणे जिल्ह्यात तू थांबू नये असे वाटते. कारण पुणे जिल्ह्यात सुप्रिया सुळे (Supriya Sule) खासदार आणि मी आमदार. त्यामुळे तुला दुसऱ्याच जिल्ह्यात जावे लागेल. त्यास त्याने होकार दिला."

Ajit Pawar, Rohit Pawar
Sushma andhare News: गोपीनाथ मुंडे होते तेव्हा भाजपमध्ये नैतिकता होती, पण आता...; बीडमध्ये सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

माझा पुतण्या आहे म्हणून रोहितचे कौतूक नाही. तर तो ज्या पद्धतीने काम करतो, त्याचे कौतूक आहे, असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, "नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड गेले अनेक वर्षे आपला मतदारसंघ नव्हता. तेथे भाजपचे सदाशिव लोखंडे यांचे वर्चस्व होते. त्यापूर्वीही राखीव असल्याने तेथे इतर लोक निवडून येत होते. आता दोन टर्म तेथे भाजपचे राम शिंदे आमदार होते. आता मात्र ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. मला रोहितचे कौतूक आहे. ते पुतण्या म्हणून नाही. मी सांगितल्याप्रमाणे तेथे बूथनिहाय काम करण्यास त्याने सुरुवात केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) ताकद नसतानाही ते काही हजार मतांनी निवडून आले."

Ajit Pawar, Rohit Pawar
Rahul Gandhi News : सिद्धरामय्यांच्या शपथ विधी सोहळ्याला दिग्गजांची हजेरी; राहुल गांधींचा 'बंगळुरू पॅर्टन' यशस्वी होणार?

आता पक्षातील ज्येष्ठ नेत्यांपासून भाकरी फिरविण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, "विद्यार्थी संघटनेत २२ ते २८ वयातील पदाधिकारी असावेत. युवकचा अध्यक्ष २८ ते ३४ वर्षांपर्यत असावा. काळानुसार पदाधिकाऱ्यांना वेगवेगळी संधी दिली पाहिजे. आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेत भाकरी फिरविण्याची काम करण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वी पक्षाच्या झालेल्या बैठकीत काही निर्णय झाले. त्यात आमच्यापासून भाकरी फिरविण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. बारामती, पुणे (Pune), पुणे ग्रामीण, पिंपरी-चिंचवडमध्ये नविन नेतृत्व पुढे आणण्याचे निर्णय झाले आहेत. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातही होणार आहे. ज्येष्ठांनी युवकांना मार्गदर्शन करावे."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in