‘दोन-तीन दिवसांत काय चमत्कार घडू शकतो?, हे फक्त राजन पाटीलच दाखवू शकतात...’

अजित पवार यांनी केले बाळराजे, अजिंक्यराणा आणि माजी आमदार राजन पाटील यांचे कौतुक
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

मोहोळ (जि. सोलापूर) : बाळराजे आणि अजिंक्यराणा पाटील यांनी या शेतकरी मेळाव्याचे उत्कृष्ट आयोजन केले आहे. मी त्यांना दोन ते तीन दिवसांपूर्वी सांगितले होते की, सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील कल्याण आखाड्याच्या मेळाव्यासाठी मी येणार आहे. तेव्हा त्यांनीही म्हटले होते की, आम्ही शेतकरी मेळावा घेतो आणि दोन ते तीन दिवसांत काय चमत्कार घडू शकतो, हे फक्त राजनमालकच दाखवू शकतात, हे आपल्या सर्वांना या मेळाव्याच्या निमित्ताने दिसत आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राजन पाटील (Rajan Patil) यांनी केलेल्या मेळाव्याच्या नियोजनाचे कौतुक केले. (Ajit Pawar praised Balraje, Ajinkyarana and Rajan Patil)

मोहोळ तालुक्यातील अनगर येथे नगरपंचायत झाल्याबद्दल आज (ता. ३० एप्रिल) कृतज्ञता आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन अनगरमध्ये करण्यात आले होते. त्या मेळाव्यास प्रचंड गर्दी झाली होती. तसेच नेटके नियोजन पाहून अजित पवार यांनी राजन पाटलांबरोरबच बाळराजे आणि अजिंक्यराणा यांचेही कौतुक केले.

Ajit Pawar
ऐकून तर घे ना शहाण्या...राजन पाटलांसाठी मी साहेबांशी बोलेन..!

ते म्हणाले की, जनतेचे प्रेम, लोकांचा भरभक्कम पाठींबा, जनतेचा नेतृत्वावर आणि नेतृत्वाचा जनतेवर असणारा विश्वास, यातूनच आजच्या मेळाव्यासारखं उदाहारण उभं राहतं. ते काय येरागबाळ्याचं काम नाही. त्यामुळे राजन पाटलांना धन्यवाद देतो. शेती आणि पिण्याच्या पाणी प्रश्नासंदर्भात माजी आमदार राजन पाटील आणि आमदार यशवंत माने यांनी काही मागण्या केल्या आहेत. जलसंपदा खाते पूर्वी माझ्याकडे होते, आता ते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे आहे. मोहोळच्या प्रश्नावर येत्या ४ मे रोजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील आणि माझ्या उपस्थितीत मंत्रालयात अधिकाऱ्यांबरोबर बैठक लावण्यात येईल. मोहोळ परिसरासाठी जे जे करता येईल, ते ते करण्यासाठी मी माझे सर्वस्व पणाला लावीन.

Ajit Pawar
सोलापूर जिल्हा बॅंक चालवायला मी अन्‌ शरद पवारांनी यायचं का? : अजितदादांनी सुनावले

अनगर आणि मोहोळ नरपंचायतीच्या इमारतीसाठी राजन पाटील यांनी प्रत्येकी दहा कोटी रुपये मागितले आहेत. मात्र, या वर्षी लगेच दहा कोटी रुपये मंजूर करता येणार नाही. पण, मुंंबईला गेलो की मोहोळ आणि अनगर नरपंचायतीसाठी प्रत्येकी पाच कोटी रुपये देण्यात येतील. ते पाच कोटी रुपये ३१ मार्चपर्यंत संपवले, तर लगेच उर्वरीत पाच कोटी रुपयेही देतो. तुम्ही देखणी वास्तू उभारावी, अशी सूचनाही अजित पवार यांनी या वेळी केली.

Ajit Pawar
राज ठाकरेंच्या ताफ्याला दुसऱ्यांदा अपघात; पुणे शहराध्यक्ष बाबरांच्या गाडीचा समावेश

ते म्हणाले की, मतदारसंघाची फेररचना झाली, काही ठिकाणी आरक्षण पडलं. त्यात मोहोळ मतदारसंघाचा समावेश झाला, त्यामुळे राजन पाटील यांच्यासाख्या चांगल्या नेत्याला थांबावे लागले. या ठिकाणाहून तुम्ही इंदापूरच्या पण मूळच्या मोहोळ तालुक्यातील यशवंत माने यांना आमदार केले. राजन पाटील यांना संधी देण्याबाबत शरद पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, याबाबतची खात्री मी तुम्हाला देतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com