अजितदादांनी केले आमदारांना खूष : दोन वर्षांत स्थानिक निधी दुप्पट
Deputy Chief Minister Ajit PawarSarkarnama

अजितदादांनी केले आमदारांना खूष : दोन वर्षांत स्थानिक निधी दुप्पट

महाराष्ट्रातील ( Maharashtra ) आमदारांच्या ( MLA ) मतदारसंघाला वार्षिक विकासनिधीत चक्क एक कोटी रूपये म्हणचे 30 टक्क्यांपेक्षाही जास्त वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विशेष म्हणचे दोनच वर्षांत आमदारांचा विकासनिधी दुप्पट झाला आहे.

अहमदनगर : देशातील इंधनाचे दर वाढत आहेत. तशी महागाईही वाढत आहे. त्यामुळे सामान्यांना आहे त्या पगारात घर खर्च लावावा लागत आहे. मात्र ही चिंता आता महाराष्ट्रातील आमदारांना असणार नाही. कारण त्यांच्या मतदारसंघाला वार्षिक विकासनिधीत चक्क एक कोटी रूपये म्हणचे 30 टक्क्यांपेक्षाही जास्त वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विशेष म्हणचे दोनच वर्षांत आमदारांचा विकासनिधी दुप्पट झाला आहे. Ajit Pawar made MLAs happy: Local funds doubled in two years

जिल्हा वार्षिक योजना राबविताना स्थानिक लोकांना उपयुक्त असलेली व सहजरित्या पूर्ण होणाऱ्या लहान कामांना आवश्यक असलेला निधी कमी प्रमाणात उपलब्ध होतो. यामध्ये शाळाखोल्या बांधकाम, अंगणवाडी केंद्र बांधकाम, व्यायामशाळा बांधकाम, स्मशानभूमीची कामे, शौचालये बांधकाम, कोल्हापूर पध्दतीचे लहान बंधारे आदी प्रकारच्या लहान कामाचा समावेश आहे. स्थानिक लोकांच्या गरजा पूर्ण करण्याकरीता विधानसभा व विधानपरिषद सदस्य यांना आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत 2011-12 या आर्थिक वर्षापासून 2 कोटी रुपये एवढा निधी उपलब्ध करून दिला जात होता. तथापि, वाढती महागाई पाहता राज्य सरकारने 2020-21 या आर्थिक वर्षात विधानसभा सदस्य व विधानपरिषद सदस्य यांना प्रतिवर्षी 3 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला.

Deputy Chief Minister Ajit Pawar
अजित पवार कार्यकर्त्यांना म्हणाले; आपण कायद्याचे पालन करणारे; निदर्शने कशासाठी ?

गेल्यावर्षी वाढ होऊनही 2021-22 च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्या” या विषयावरील चर्चेला उत्तर देतांना उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) अजित पवार यांनी दिलेल्या आश्वासनानुसार आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत आमदार निधीत 1 कोटी रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता आमदार निधी 4 कोटी एवढा असणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय राज्याच्या नियोजन विभागाने जाहीर केला आहे.

या निर्णयात म्हटले आहे की, आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत 2021-2022 या आर्थिक वर्षापासून विधानसभा सदस्य व विधानपरिषद सदस्य यांना प्रतिवर्षी 3 कोटीच्या निधीत आणखी 1 कोटीची वाढ करून प्रतिवर्षी 4 कोटी रुपये करण्यास राज्य शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

Deputy Chief Minister Ajit Pawar
अजित पवार म्हणाले; मी पळून चाललेलो नाही

आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत 2021-22 या आर्थिक वर्षापासून आमदारांना उपलब्ध होणाऱ्या 4 कोटी रुपये निधीमधून नियोजन विभाग स्थानिक लोकांच्या गरजेनुसार उपयुक्त व सहजरित्या पूर्ण होणारी लहान कामे घेता येतील.

आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत 2021-22 या आर्थिक वर्षापासून उपलब्ध होणाऱ्या प्रतिवर्ष 4 कोटी रुपये निधीमधून 10 टक्के निधी नियोजन विभागाच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत तसेच अन्य शासकीय कार्यक्रम योजनांतर्गत बांधण्यात आलेल्या वास्तू अथवा मालमत्तांच्या देखभाल व दुरुस्तीकरिता खर्च करता येईल, असे शासन निर्णयात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in