मार्चपर्यंत इंपेरिकल डेटा मिळण्यासाठी आग्रही : अजित पवार

केंद्राने Central Government कायद्यात दुरुस्ती करा म्हटले तर, आम्ही टोलवाटोलवी करतो अशी टीका होते, अजित पवार Ajit Pawar यांचा केंद्र सरकारला चिमटा
मार्चपर्यंत इंपेरिकल डेटा मिळण्यासाठी आग्रही : अजित पवार

Ajit Pawar

sarkarnama

खंडाळा : राज्यातील निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय होत आहे. यासंबंधी असणारा इंपेरिकल डाटा हा दोन महिन्यात मार्च एंडपर्यंत होणे अपेक्षित आहे. यासाठी लागणारा निधी व कर्मचारी वर्ग महाविकास आघाडीने उपलब्ध करुन दिला आहे.तरी मार्चपर्यतं हा इंपेरिकल डाटा मिळावा, यासाठी आम्ही आग्रह धरणार असल्याची  माहिती उपमुख्यमंञी अजित पवार यांनी आज दिली.

नायगाव (ता.खंडाळा) येथे सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने अभिवादन करण्यासाठी आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले,''यासाठी दोन्हीही सभागृहाच्या मंजुरीने लागणारा निधी व सर्व स्टाफ महाविकास आघाडीने उपलब्ध करुन दिल्याने आता याविषयी निधीची कमतरताची अडचण दुर झाली आहे. याआधी मुख्यमंत्री व मी आयोगाशी बोललो असता दोन महिन्यात इंपेरिकल डाटा देऊ असे सांगितले होते. यानंतर आता ही आयोगाशी पुन्हा बोलु असे आयोगाने ठरवले तर दोन महिन्यात हे पूर्ण व्हायला हरकत नाही.तरी येत्या दोन महिन्यात हा इंपेरिकल डाटा देण्यासंबधी आम्ही आग्रह धरणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

<div class="paragraphs"><p>Ajit Pawar</p></div>
शरद पवारांची मर्जी राखण्यासाठीच छगन भुजबळ ओबीसी आरक्षणाबाबत आग्रही नाहीत 

राज्यातील ओबीसी आरक्षण संबंधी बोलताना श्री. पवार म्हणाले,''जोपर्यंत ओबीसी समाजाला लोकप्रतिनिधीची संधी मिळत नाही तोपर्यंत निवडणूका घेऊ नका असा ठराव महाविकास आघाडीने केला होता. हा प्रश्न केवळ महाराष्ट्रापुरता नसुन मध्यप्रदेश व इतर राज्यातही आहे.म्हणून केंद्र सरकारने याबाबत कायद्यात दुरुस्ती ही करु शकत होते.माञ, आम्ही असे म्हटले तर आम्ही टोलवाटोलवी करतो असे बोलले जाते.

ओबीसी आरक्षणाबाबत शरद पवार,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीची इच्छा असल्याचे आजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील,पालकमंञी बाळासाहेब पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच कोरोना संबधी लहान मुलांचे लसीकरण करुन घ्यावे.कोरोना संकट वाढताना काळजी घ्या, असे  आवाहन त्यांनी केले.

<div class="paragraphs"><p>Ajit Pawar</p></div>
ओबीसींचा इम्पेरिकल डेटा मार्चपर्यंत मिळणार: अजित पवार,पाहा व्हिडिओ

कोरोना काळात एकदाही अजितदादा मास्कविना कधीही माईक समोर आलेले दिसले नाहीत. याची चर्चा सर्वत्र होत असतानाच, कोराेनाच्या नियमावलीची पायमल्ली होऊ नये म्हणून मी सकाळी लवकरच अभिवादन करण्यासाठी नायगांवला आलो असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.