
Ajit Pawar : लव जिहाद सारखे मु्द्दे उपस्थित करून त्याच्या नावाखाली समाजामध्ये विष पसरवण्याचं काम सुरू आहे. आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी जाती जातींमध्ये तेढ निर्माण करायचं काम केलं जात आहे. मात्र हे जे काही आज समाजामध्ये असले प्रकार सुरू आहेत, त्याच्या विरोधात ज्या प्रमाणात उठाव झाला पाहिजे, तसा तो काही होताना दिसत नाही, अशी खंत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बोलून दाखवली.
अजित पवार (Ajit Pawar) आज सांगली (Sangli News) जिल्ह्यात होते. कासेगावमधील क्रांती वीरांगणा इंदुमती पाटणकर यांच्या स्मारकाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमात बोलताना पवार यांनी ही खंत बोलून दाखवली.
कासेगाव मधील क्रांती-वीरांगणा इंदुमती पाटणकर (Indumati Patankar) यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा पवारांनी केली. या स्मारकासाठी दोन विधान परिषद (MLC) आमदारांच्या निधीतून जवळपास 22 लाख आणि सीएसआरमधून एकूण 5 लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे अजित पवारांनी घोषणा केली आहे.
साताऱ्यातीलआमदार मानसिंगराव नाईक (Mansinghrao Naik) व आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्या आमदारकीय निधीतून प्रत्येकी 11 लाख, असे एकूण 22 लाख रूपयांचा निधी आणि सीएसआर (CSR) फंडमधून 5 लाख, असे एकूण 27 लाख रूपयांचा निधी देण्याचे पवारांनी सांगितले
पवार म्हणाले, "क्रांती वीरांगणा इंदूमती पाटणकर यांचा स्वातंत्रलढ्यात योगदान आहेच , त्यांना जाती अंताचा लढा देखील या भूमीत उभा केला.त्या काळात त्यांनी आंतरजातीय विवाह लावून देण्याचं काम केलं. आता याच भूमीतील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दोन्ही मुलांचा आंतरजातीय विवाह संपन्न झाले आहेत. अलीकडे 'सेक्युलर' या शब्दाला (Ajit Pawar on Love Jihad) कुठेतरी तिलांजली देण्याचं काम काही लोकांकडून केला जात आहे. हे आपल्या देशाच्या दृष्टीकोनातून अतिशय अडचणीचं असणार आहे."
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.