Ajit Pawar : महागाई व बेरोजगारीचा सरकारला विसर

भानसहिवरे (ता.नेवासे) येथे सुलोचना बेल्हेकर शिक्षण संस्थेच्या पी.व्ही बेल्हेकर आयुर्वेद रुग्णालयाचे उदघाटन नंतर झालेल्या कार्यक्रमात विरोधीपक्ष नेते अजित पवार ( Ajit Pawar ) बोलत होते.
Ajit Pawar
Ajit Pawarsarkarnama

विनायक दरंदले

Ajit Pawar : राज्यात सध्या महागाई व बेरोजगारीचा मोठा प्रश्न 'आ' वासून असताना आताचे सरकार आपल्याच तालात आहे. महत्त्वाच्या प्रश्नावर कुणीच काही बोलत नसल्याने या सरकारला आता खडबडून जागे करण्याची भुमिका हाती घेतली जाईल, अशी खरमरीत टीका विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी केली.

भानसहिवरे (ता.नेवासे) येथे सुलोचना बेल्हेकर शिक्षण संस्थेच्या पी.व्ही बेल्हेकर आयुर्वेद रुग्णालयाचे उदघाटन नंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार नरेंद्र घुले-पाटील होते. यावेळी माजी आमदार चंदशेखर घुले-पाटील, पांडुरंग अभंग, माजी आमदार भानुदास मुरकुटे, राजेंद्र फाळके, संदीप वर्पे, आशुतोष शिंदे, जेष्ठ नेते भाऊसाहेब पटारे, 'मुळा' चे अध्यक्ष नानासाहेब तुवर उपस्थित होते. डॉ. रंजना बेल्हेकर, अशोक व रमेश बेल्हेकर यांनी मान्यवरांचा सत्कार केला.

Ajit Pawar
Ajit Pawar ED Enquiry : अजित पवारांच्या अडचणी वाढणार?

संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश बेल्हेकर यांनी प्रास्ताविक भाषणात शैक्षणिक व आरोग्य उपक्रमाची माहिती दिली. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकारने माणसांच्या जीवाला महत्त्व देवून कोरोना संकटाचा सामना केला. आज साजरे होणारे गर्दीचे उत्सव आणि सोहळे आम्ही राबविलेल्या आरोग्य सुविधांमुळे पाहण्यास मिळत आहे, असे सांगून पवार यांनी व्यसन,स्वच्छता,आहार व योग प्राणायाम बाबत प्रबोधन केले. राजकीय व्यासपीठ नसल्याने येथे काही बोलत नाही मात्र घुले बन्धूंनी अतिवृष्टी व अन्य प्रश्नांचे निवेदन दिल्याने सरकारला धारेवर धरण्यासाठी नगरचे शिलेदार आमदार संग्राम जगताप, नीलेश लंके, प्राजक्त तनपुरे, डॉ. किरण लहामटे व आशुतोष काळे यांच्यासह आवाज उठविला जाईल. असे पवार यांनी सांगितले. वैभव बेल्हेकर यांनी स्वागत केले. मिना दिघे व रेवणनाथ पवार यांनी सूत्रसंचालन केले. नरेंद्र घुले पाटील यांनी आभार मानले.

Ajit Pawar
Ajit Pawar : मुख्यमंत्री शिंदेंच्या भाषणाबाबत अजितदादा म्हणाले, "काही जणांची भाषणं.."

मुरकुटे आणि ताप..

अजित पवार यांनी आपल्या भाषणात माजी आमदार भानुदास मुरकुटे वय 80 असताना आजही रोज व्यायाम करत असल्याने ठणठणीत आहेत. त्यांनी अनेकांना ताप आणला असला तरी त्यांना कधीच ताप आलेला नाही असे सांगून आरोग्य प्रबोधन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com