Ajit Pawar News : मंत्र्याचं नाव घेत अजित पवारांनी घेतला राज्य सरकारचा समाचार; म्हणाले "चार दिवस सासूचे..."

State Government : विरोधकांच्या विधायक कामांत सरकारचा अडथळा
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

Ajit Pawar Attack on State Government : कोल्हापुरात अनेक कामे करायची आहेत. ती कामे झटपट झाली पाहिजे. माझ्या काळात कुणीही आले तरी सर्वांची कामे कशी मार्गी लागतील याकडे लक्ष देत होते. कारण काळ वेळ कुणासाठी थांबत नाही. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक गोष्टीबाबत खूप वाईट अनुभव आल्याचे सांगित विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. ते कोल्हापूर येथे बोलत होते.

शिंदे-फडणवीस सरकार (State Government) विरोधकांच्या मतदारसंघातील विकासकामांत अडथळे आणत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. अजित पवार म्हणाले, "आमचे सरकार असताना मी कुणाचेही काम कधीही अडवून धरले नाही. सर्व पक्षांच्या आमदारांची कामे करण्यास प्राधान्य दिले. सध्याचे सरकार मात्र तसे करताना दिसत नाही. विरोधकांची कामे अडवूण्यात त्यांना स्वारस्य वाटते. यातून जनतेचे नुकसान होते, याकडे ते लक्ष देत नाहीत."

Ajit Pawar
Ajit Pawar Statement : अजितदादांनी केलं रोहित पवारांचं कौतुक; म्हणाले...

यावेळी पवार यांनी कोल्हापूरातील के. बी. पाटील यांच्या कारखान्याबाबत घडलेल्या किस्साच सांगितला. पवार म्हणाले, "के.बी. पाटलांच्या कारखान्यात आता डिस्टलरी करायची आहे. ती फाईल एक्साईज मिनिस्टरकडे पडली आहे. त्याबाबत मी संबंधित मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांना फाईल क्लिअर करण्यास सांगितले. मात्र त्यांनी सांगितले की आमचे शिंदे गटाचे आमदार म्हणतायत की फाईल क्लिअर करायची नाही."

Ajit Pawar
Ajit Pawar : अजित पवारांनी काढला सतेज पाटलांना चिमटा; म्हणाले "बंटीला आता बंटी झाले तरी..."

मंत्र्याच्या या धोरणांचा पवार (Ajit Pawar) यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, "हे असले कसले राजकारण? त्यांना वाटत असेल तर त्यांनी निवडणुकीच्या माध्यमातून कारखाना ताब्यात घ्यावा. पण या अडमुठेपणामुळे जनतेलाच त्रास होणार आहे. त्यासाठी काढलेले कर्ज व त्याचे व्याज कुणाला भरावे लागणार? विरोधकांचे विधायक काम असले तरी ते करताना आम्ही मागे पुढे पाहत नाही. विकासकामे ही जनतेची असतात. या कारखान्याचे ७० हजार सभासद आहेत. सरकार येत असतात-जातात. सरकार येते, सरकार जाते. चार दिवस सासूचे तर चार दिवस सूनचेही असतात. मात्र ससत्तेची मस्ती, नशा डोक्यात शिरू देऊ नये."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in