साताऱ्यात उद्योजक का येत नाहीत ? ; अजितदादांचा उदयनराजेंवर हल्लाबोल

काही जण ठेकेदारीत, वाळूउपसामध्ये हस्तक्षेप करतात, टोलनाका चालविणारे म्हणून मिरवतात..

साताऱ्यात उद्योजक का येत नाहीत ? ; अजितदादांचा उदयनराजेंवर हल्लाबोल
Udayanraje Bhosale, Ajit Pawarsarkarnama

सातारा : "सातारा एमआयडीसीमध्ये उद्योग का येत नाही," असा सवाल उपस्थित करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी अप्रत्यक्षपणे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्यावर टीका केली. (ajit pawar latest news)

सातारा (Satara) जिल्ह्यातील माण-खटाव तालुक्यात असणाऱ्या 48 गावांना 2.5 टी.एम.सी पाणी आरक्षित केल्याबद्दल कृतज्ञा सोहळ्याचे आयोजन वरकुटे मलवडी येथे करण्यात आले होते. यावेळी अजित पवार (Ajit Pawar) बोलत होते.

"लोकप्रिनिधी चांगले असतील तर कामे चांगली होतात, मात्र लोकप्रतिनिधीच ठेकेदाराला पाठिशी घालत असेल तर काम नीट होत नाहीत. सातारा एम आयडीसीचे उदाहरण समोर आहे, सातारा एमआयडीसीसाठी सगळ्या बाबी पोषक असताना सुद्धा उद्योजक एमआयडीसीमध्ये येत नाहीत, साताऱ्यात उद्योग का येत नाहीत," असा सवाल अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला.

Udayanraje Bhosale, Ajit Pawar
मोठी बातमी : श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत ड्रग्ज प्रकरणात ताब्यात ; ड्रग्ज घेतल्याचे निष्पन्न

"एखादा रस्ता पंचवीस वर्ष टिकला पाहिजे, असे काम झाले पाहिजे, पण काही जण ठेकेदारीत, वाळूउपसामध्ये हस्तक्षेप करतात, टोलनाका चालविणारे म्हणून मिरवतात, खंडणीखोरांना पाठिशी घालतात. अशा प्रकारे जर लोकप्रतिनिधी वागत असतील, तर त्या मतदाराचं काय होईल, याचा शांतपणे विचार करा, आज सातारा एमआयडीसीमध्ये उद्योग बंद पडायला लागले, याचे कारण का ? साताऱ्यात मोठे उद्योग का येत नाहीत, सहा पदरी महामार्ग, पाण्याची सुविधा असतानाही येथे उद्योतांग का येत नाहीत," असे विविध प्रश्न अजितदादांनी उपस्थितांना विचारले.

"काही जणांनी सभा घेऊन सांगितलं की पुढचा आमदार आमचाच, ही काय यांच्या घरची पेंढ आहे का, शेवटी मतदार तुम्ही आहात, कुणालाही निवडणुकीत निवडून द्यायचं याची जबरदस्त ताकद तुमच्यात आहे," असे अजित पवार म्हणाले.

Udayanraje Bhosale, Ajit Pawar
प्रवीण दरेकरांचा ताफा अडविणाऱ्या मुंडे समर्थकांवर गुन्हा दाखल

"विकास कामात अडथळा आणला तर ती व्यक्ती माझ्या घरातील असो की राष्ट्रवादीची (ncp)असो, आम्ही पोलिसांना कारवाई करण्यास सांगतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल साताऱ्यातील एका कार्यक्रमात स्पष्ट केलं. अजित पवार (ajit pawar) यांनी सातारा दौऱ्यात लोकप्रतिनिधी, ठेकेदार, अधिकाऱ्यांना सज्जड दम दिला. यावेळी अजित पवार यांनी राज्यातील काही भागातील काही लोकप्रतिनिधी चुकीचं वागत असल्याचं आणि त्याबाबत एक व्हिडीओ क्लिप मिळाल्याचं सांगितलं.

“मला आत्ता एक व्हिडिओ क्लिप मिळाली. त्यानंतर मी ताबडतोब पोलिस अधीक्षकांना बोलावलं. मी अभयसिंग जगताप यांच्या घरात जेवायला थांबलो होतो तेव्हा पोलिस अधीक्षकांना ती क्लिप दाखवली. संबंधितांना बोलावून ठेकेदाराचं काही चुकत असेल तर त्याला समजाऊन सांगण्यास सांगितलं. मात्र, लोकप्रतिनिधींच्या नावावर कुणी चुकीचं काम करत असेल तर ते खपवून घेऊ नका, असं पोलिसांना सांगितलं आहे,” असे अजित पवार म्हणाले. यावेळी अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत भाजप आणि काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीत प्रवेश केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in