अजित पवार, अण्णा हजारे उद्या दिसणार एकाच व्यासपीठावर

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ( Anna Hazare ) व ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्यातील संबंध कधी मधूर राहिलेले नाहीत. त्यामुळे अण्णा हजारे व पवार कुटूंबीय कधी सहसा एकत्र दिसत नाहीत.
अजित पवार, अण्णा हजारे उद्या दिसणार एकाच व्यासपीठावर
अजित पवार, अण्णा हजारेसरकारनामा

अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यातील संबंध कधी मधूर राहिलेले नाहीत. त्यामुळे अण्णा हजारे व पवार कुटूंबीय कधी सहसा एकत्र दिसत नाहीत. अशातच पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील एका धार्मिक कार्यक्रमासाठी अण्णा हजारे व उपमुख्यमंत्री अजित पवार एका व्यासपीठावर दिसणार आहेत. त्यामुळे राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. Ajit Pawar, Anna Hazare will appear on the same stage tomorrow

उत्तर पेशवेकालीन संत निळोबाराय हे पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथे रहायचे. पिंपळनेर हे गाव राळेगण सिद्धी जवळ आहे. संत निळोबाराय महाराजांचा अभंग गाथा प्रकाशन सोहळा व विठ्ठल-रुक्मिणी मंदिर जीर्णोध्दार शुभारंभ कार्यक्रम अण्णा हजारे व अजित पवार यांच्या हस्ते रविवारी ( ता. 21 ) सकाळी होणार आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार नीलेश लंके आदी उपस्थित राहणार आहेत.

अजित पवार, अण्णा हजारे
अण्णा हजारे म्हणाले, हा विजय विरोधकांचा नसून शेतकऱ्यांचा...

अण्णा हजारे व पवार कुटूंबात वितुष्ट का?

वितुष्ट सुरू झालं ते अण्णा हजारेंच्या पहिल्या भ्रष्टाचार आंदोलनापासून. 1989ला अण्णा हजारे यांनी सामाजिक वनीकरण व पाणी पुरवठा योजनांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली. त्यावेळी नेमके शरद पवार मुख्यमंत्री होते. त्यांच्याकडेच वनखाते होते. या भ्रष्टाचार प्रकरणांत कारवाई होत नसल्याचे पाहत अण्णा हजारे यांनी वृक्षमित्र पुरस्कार राज्य सरकारला परत केला. त्यावेळी शरद पवार व अण्णा हजारेंत शाब्दिक चकमकीही झाल्या. आंदोलने करूनही मार्ग निघत नसल्याने अण्णा हजारे यांनी 1994ला पद्मश्री पुरस्कारही परत केला. त्याच वर्षी त्यांनी भ्रष्टाचार विरोधातील पहिले उपोषण केले होते. महाराष्ट्र दिनी सुरू केलेले हे उपोषण सहा दिवस चालले. अण्णांच्या आंदोलनामुळे काँग्रेसचे सरकार गेले. युतीचे सरकार 1995ला सत्तेत आले.

अजित पवार, अण्णा हजारे
अजित पवार म्हणाले, सरकार नोटा छापायची मशिन नाही...

अण्णा हजारेंमुळेच सरकार गेले हे शरद पवारांनी मनावर घेतले. युती सरकारवरही अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. युती सरकारने अण्णा हजारेंना पुण्याच्या येरवाडा कारागृहात रवानगी केली होती. तरीही यावर शरद पवार यांनी भाष्य करणे टाळले.

मनमोहन सिंग पंतप्रधान असताना अण्णा हजारे यांनी जंतरमंतरवर लोकपालसाठी आंदोलन केले. त्यावेळीही शरद पवारांनी भाष्य करणे टाळले. दिल्लीत शरद पवार यांना एकाने थप्पड मारली होती. त्यावेळी अण्णा हजारे यांनी 'एकही थप्पड मारा क्या' असे म्हटले होते. मनमोहन सिंग लोकपाल कायद्याच्या मसुदा समितीवर पवारांना घेणार होते. मात्र त्याला अण्णा हजारे यांनी विरोध केला होता. अण्णा हजारेंबाबत शरद पवार काहीच बोलत नाहीत. त्यांच्या वक्तव्यावर काहीही प्रतिक्रिया देणे ते टाळतात.

अजित पवार, अण्णा हजारे
हजारे, पवार यांच्या उपस्थितीत आमदार जगताप यांचे `स्वच्छ प्रेरणा अभियान` सुरू

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अण्णा हजारेंनी आरोप केले होते. तसेच न्यायालयात याचिकाही दाखल केली. या प्रकरणात कॅग, नाबार्डच्या अहवालात शरद पवारांचे नाव नाही. मात्र, त्यात अजित पवार यांचे नाव असल्याचे अण्णा हजारेंनी सांगितले होते. तसेच साखर कारखाने विक्री प्रकरणीही अण्णा हजारेंनी अजित पवारांवर आरोप केले होते. त्याच अजित पवारांबरोबर उद्या ( रविवारी ) अण्णा हजारे व्यासपीठावर दिसणार आहेत.

अण्णा हजारे यांनी 1980 पासून आतापर्यंत 16 वेळा उपोषणे केली. यातील तीन केंद्र सरकार विरोधात तर 13 उपोषणे राज्य सरकार विरोधात केली.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in