अजित जगताप म्हणतात, नगरपालिकेत गैरप्रकार आढळल्यास उमेदवारी अर्ज भरणार नाही...

Ajit Jagtap : नगरपालिकेत आम्ही केलेल्या कामकाजाची विशेष लेखापरीक्षक नेमून चौकशी करावी.
Ajit Jagtap Latest News
Ajit Jagtap Latest News Sarkarnama

मंगळवेढा : नगरपालिकेच्या पाच वर्षाच्या काळात कोठ्यावधी रुपयाच्या निधी आणून विकास कामे केली.असून नगरपालिकेत आम्ही केलेल्या कामकाजाची विशेष लेखापरीक्षक नेमून चौकशी करावी. त्यामध्ये अनियमितता आढळल्यास नगरपालिकेच्या निवडणुकीत अर्ज भरणार नसल्याचे पक्षनेते अजित जगताप (Ajit Jagtap) यांनी सांगितले.

दामाजी कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतर ते कारखाना कार्यस्थळावर पत्रकारांशी बोलताना स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जाहीर होण्याआधीच जगतापांनी रणशिंग फुंकले आहे. (Ajit Jagtap Latest News)

Ajit Jagtap Latest News
Satara: पालिकेची निवडणूक आल्यानेच उदयनराजेंची दिल्लीत नौटंकी.. शिवेंद्रसिंहराजे

जगताप म्हणाले की, दामाजी कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मी सत्ताधारी गटावर विशेष लेखापरीक्षक निकाळजे यांच्या अहवालाचा आधार धरून मी सत्ताधाऱ्यावर आरोप केले. कारखान्यावरील कर्ज साखर विक्री भविष्य निर्वाह निधीची रक्कम हे विषय त्यामध्ये होते. मात्र सत्ताधाऱ्यातील काहींनी नगरपालिकेच्या कामात गैरप्रकार केल्याचा आरोप आमच्यावर केला आहे.

नगरपालिकेच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात मी व थेट नगराध्यक्ष असलेल्या अरुणा माळी यांनी सुरुवातीच्या काळात विधानपरिषद सदस्य प्रशांत परिचारक यांच्या माध्यमातून व नंतरच्या काळात महाविकास आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून नगरपालिकेला कोट्यावधीचा निधी आणून ती कामे केली आहेत सदरची कामे नियमाला अनुसरून केल्याचे त्यांनी सांगितले.

Ajit Jagtap Latest News
खासदार लोखंडेंना दहा फोन केले तरीही ते गेलेच : संतप्त शिवसेना जिल्हा प्रमुखाने दिले हे आव्हान...

ते पुढे म्हणाले की, तरी देखील नगरपालिकेतील कामातील गैरप्रकार काढायला सुरूवात केली म्हणून मी सत्ताधाऱ्यांवर आरोप करीत असल्याचा आरोप प्रचारादरम्यान माझ्यावर केला होता. सत्ताधारी गटावर मी कारखान्यावर कर्जा संदर्भात केलेला आरोप कार्यकारी संचालकच्या अधिकृत आकडेवारीनुसार तो 198 कोटीच्या आसपास आहे. उलट मी प्रचारादरम्यान केलेले आरोप हे खरे निघाले आहेत. समविचारी गटाच्या माध्यमातून कारखान्यावर सत्ता स्थापन केल्यानंतर आता समविचारी गटाचा मोर्चा नगरपालिकेकडे वळविला असल्याचे जगताप यांनी अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com